१९८३ त्या पार्टीच्या खर्चाचे रहस्य अजूनही गुलदस्त्यातच - कपिल देव 

टीम ई-सकाळ
Thursday, 25 June 2020

भारतीय क्रिकेट संघाने कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली १९८३ मध्ये वेस्ट इंडिजच्या संघाला अंतिम सामन्यात धूळ चारत विश्वचषक जिंकला होता. यानंतर कपिल देव यांनी क्रिकेटची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इंग्लंडच्या लॉर्ड्स मैदानावर विश्वचषक उंचावताना संपूर्ण देश स्तब्ध झाला होता. आज २५ जून रोजी या ऐतिहासिक घटनेला ३७ वर्षे पूर्ण होताना, विश्वचषक जिंकलेल्या भारतीय क्रिकेट संघातील खेळाडूंना आजही त्या आठवणी ताज्या असल्याचे म्हटले आहे.  

एका कार्यक्रमात कपिल देव यांनी या प्रसंगाविषयी बोलताना, अंतिम सामन्यात विजय मिळवल्यानंतर विश्वचषक ट्रॉफी घेऊन संघातील सहकाऱ्यांसोबत विजय साजरा करायचा होता. मात्र ट्रॉफी देण्याच्या वेळेस होणारे प्रजेंटेशन बऱ्याच वेळ चालू होते. आणि त्यामुळे यावेळेस कधी एकदा प्रजेंटेशन संपते आणि आपण सहकाऱ्यांजवळ जाऊन आनंद साजरा करतो अशी भावना मनात आल्याचे, कपिल देव यांनी सांगितले.  

यासोबतच एका मुलाखती दरम्यान कपिल देव यांनी, त्यावेळेस खेळाडूंना टूर वर असताना फार कमी पैसे खर्चासाठी मिळत असल्याचे सांगत, विश्वचषक जिंकल्यानंतर हॉटेलवर पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी सर्व खेळाडूंनी पार्टी एन्जॉय केली. मात्र खळाडूंचे बजेट मर्यादित असल्यामुळे या पार्टीचे बिल कोण देणार ? हा प्रश्न त्यावेळेस आपल्या मनात डोकावल्याचे कपिल देव यांनी सांगितले. आणि त्यानंतर सुद्धा या पार्टीचे शेवट पर्यंत कोणी पैसे दिले, हे आपल्याला कळाले नसल्याचे कपिल देव यांनी सांगितले.          

तर, भारतीय क्रिकेट संघातील खेळाडू के. श्रीकांत यांनी, त्यावेळेस बऱ्याच वेळ आपल्याला विश्वचषक सामना जिंकून भारतीय संघ वर्ल्ड चॅम्पियन झाल्याचा विश्वासच बसत नव्हता, असे सांगितले. त्यामुळे आनंदाच्या भरात सलग २० सिगरेट पिल्याचे के. श्रीकांत यांनी सांगितले. त्यामुळे लॉर्ड्सच्या मैदानावरील गॅलरीमध्ये सिगरेट पिणारे कदाचित आपण एकमेव असल्याचे श्रीकांत यांनी सांगितले.                

​ ​

संबंधित बातम्या