सुनंदन लेले

कुलदीपचे सहा बळी; रोहितचे शतक; भारताचा दणदणीत विजय

Friday, 13 July 2018

नॉटिंगहॅम : ट्रेंट ब्रीजच्या उत्तम खेळपट्टीवर इंग्लंड संघाच्या बाळसे धरू बघणार्‍या धावसंख्येला भारतीय फिरकीने  ब्रेक्स लावले. चालू दौर्‍यातील कुलदीप यादवच्या फिरकीची दहशत कायम राहिली. कुलदीपने १० षटकात २५ धावा देत सहा इंग्लिश फलंदाजांना बाद करून दणकेबाज कामगिरी केली. इंग्लंडने उभारलेल्या २६८ धावांचा भारतीय फलंदाजांनी फक्त दोन विकेट गमावून ४१ व्या षटकात सहजी पाठलाग करत ट्रेंट ब्रीज मैदानावरचा पहिला एक दिवसीय सामना जिंकला. भारताकडून रोहित शर्माने सलग दुसर्‍या सामन्यात शतक  (नाबाद १३७ धावा) झळकावून सातत्य दाखवले.

संबंधित बातम्या

पहिला एकदिवसीय सामना तुल्यबळ संघांतील लढत

Thursday, 12 July 2018

नॉटिंगहॅम : इंग्लंड संघाला टी-20 मालिकेतील अपयश पुसून काढायची चांगली खुमखुमी आहे. भारतीय संघाला एकदिवसीय मालिकेत पराभूत करायला सुधारित खेळ करावा लागेल याची कल्पना असल्याने यजमान संघ जोरदार तयारीला लागला आहे. शेवटच्या टी-20 सामन्यात वगळले गेल्याचे शल्य मनात बाळगत नव्या जोमाने कसोटी संघाचा कप्तान ज्यो रूट भारतीय गोलंदाजांना त्रास द्यायला सज्ज होतोय. विराट कोहलीच्या संघाला संभाव्य आक्रमणाची जाणीव असल्याने भारतीय संघही संपूर्ण तयारीने ट्रेंट ब्रीज मैदानावर पाऊल ठेवणार आहे. 

इंग्लंडमध्ये चर्चा फक्त फुटबॉल उपांत्य सामन्याची

Tuesday, 10 July 2018

लंडनला विंम्बल्डन चालू आहे. नॉटींगहॅमला भारत विरुद्ध इंग्लंड एकदिवसीय मालिकेला सुरुवात होत आहे. पण तुम्हांला खरं सांगतो चर्चा फक्त बुधवारी होणार्‍या फुटबॉल विश्वकरंडकतील इंग्लंड विरुद्ध क्रोएशिया या उपांत्य सामन्याची रंगत आहे. 

ही पिढी, हा संघ वेगळा आहे : हार्दिक पंड्या

Monday, 9 July 2018

ट्वेंटी20 सामन्यात 10 धावांच्या सरासरीने 198 धावांचा पाठलाग करणे सहज सोपे कधीच नसते. भारतीय संघाने ब्रीस्टलचा सामना 8 चेंडू राखत जिंकत ते सहज करून दाखवले. हे यश खेळातील कौशल्याचे आहे तसेच मानसिकतेचेही आहे. सध्याचा भारतीय संघ ‘आपण हे करू शकतो’ याचा विश्वास बाळगतो. 

रोहितच्या शतकाने भारताचा इंग्लंडमध्ये मालिका विजयाने श्रीगणेशा

Monday, 9 July 2018

जॅक बॉलला दोघा फलंदाजांनी मिळून तीन चौकार ठोकले आणि धावगती आवाक्यात आणली. संघाला दिमाखात विजयी करताना रोहितने १०० तर हार्दिक पंड्याने ३३  धावा केल्या. ५५चेंडूत शतक पूर्ण करणार्‍या रोहित शर्माला सर्वच्या सर्व प्रेक्षकांनी उभे राहून टाळ्या वाजवत मानवंदना दिली. तब्बल ८ चेंडू राखून भारतीय संघाने विजय हाती घेतला. 

अॅलेक्स हेल्सच्या खेळीने इंग्लंडची मालिकेत बरोबरी

Saturday, 7 July 2018

कार्डिफ : नाणेफेक जिंकल्यावर इंग्लंडचा कप्तान मॉर्गनने विचारपूर्वक गोलंदाजी करायचा निर्णय घेतला. इंग्लिश गोलंदाजांनी चांगले नियंत्रण ठेवून गोलंदाजी केल्याने भारतीय धावसंख्येला ५ बाद १४८अशी वेसण बसली. इंग्लंडचे प्रमुख फलंदाज बाद होत असताना अलेक्स हेल्सने नाबाद अर्धशतक करून इंग्लंडला कार्डीफ सामना जिंकून दिला आणि टी२० मालिकेत १-१ बरोबरी साधून दिली. अॅलेक्स हेल्सलाच सामन्याचा मानकरी ठरवण्यात आले.

एकमात्र कसोटीत भारताची दमदार सुरवात

Thursday, 14 June 2018

बंगळूर : अफगाणिस्तान संघाने कसोटी क्रिकेटमध्ये पाऊल ठेवले. पण त्यांच्या कौतुकाचा बहर पहिल्या दोन तासांतच संपला. बंगळूरच्या चिन्नास्वामी मैदानावर पहिल्या सत्रात उपाहारापूर्वी शिखर धवन, तर दुसऱ्या सत्रात मुरली विजयने शतकी खेळी केली. त्यानंतर पावसाच्या सरीने खेळात व्यत्यय आला.

पहिल्या दिवशी 78 षटकांच्या खेळात भारताने 6 बाद 347 धावा उभारून सामन्याची सूत्रे आपल्या हाती घेतली. अखेरच्या सत्रात अफगाणिस्तानच्या गोलंदाजांनी भारताच्या चार विकेट मिळवून सामन्यात थोडी जान आणली. 

शिखर धवनचा विक्रम; लंचपूर्वीच ठोकले शतक

Thursday, 14 June 2018

बंगळूर : अफगाणिस्तान संघाकरता कौतुकाचा बहर आणि कसोटी क्रिकेट पदार्पणाचा जोश पहिल्या दोन तासांतच संपला. एम. चिन्नास्वामी मैदानावर शिखर धवनने उपहाराअगोदर शतक ठोकून नवे शिखर गाठले. सामन्याच्या पहिल्या दिवशी लंचपूर्वी शतक झळकाविणारा शिखऱ पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे. 27 षटकांत नाबाद 158 धावांची भागीदारी रचून भारतीय सलामीवीरांनी अफगाण खेळाडूंना कटू सत्य परिस्थितीची जाणीव करून दिली. उपहाराला खेळ थांबला असताना शिखर धवन 91 चेंडूत 19 चौकार आणि 3 षटकार ठोकून नाबाद 104 धावांवर खेळत होता. मुरली विजय संयमी 41 धावा करून त्याला साथ देत होता. 

मोठ्या मोसमासाठी भारतीय सज्ज

Wednesday, 13 June 2018

बंगळूर : "आयपीएल'चा थकवा गेल्यावर भारतीय क्रिकेटपटू आता मोठ्या क्रिकेट मोसमासाठी एकत्र आले आहेत. अफगाणिस्तानविरुद्धच्या कसोटी सामन्याने भारताच्या क्रिकेट मोसमास सुरवात होईल. आयपीएलमध्ये वेगवेगळ्या संघांतून खेळल्यानंतर आता देशासाठी खेळताना सर्व एकत्र आल्यामुळे त्यांच्या सरावात वेगळाच जोश मंगळवारी दिसून आला. 

अफगाणिस्तान या सामन्याने कसोटी क्रिकेटच्या नकाशावर येणार आहे. मात्र, सरावापासून ढगाळ हवामानाचे सावट दिसून येत आहे. ढगाळ वातावरणातच भारतीय संघाने सराव केला. प्रथम फलंदाजांनी रवी शास्त्री आणि संजय बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली सराव केला. गोलंदाजांनीही सराव केला.

इतिहास नव्याने लिहिण्याची वेळ

Tuesday, 13 February 2018

पोर्ट एलिझाबेथ : दक्षिण आफ्रिकेविरुद्ध एकदिवसीय सामन्यांची मालिका जिंकण्याची आणखी एक संधी भारताला उद्या पाचव्या एकदिवसीय सामन्यात मिळणार आहे. भारताने उद्याच्या सामन्यात मिळविलेला विजय खऱ्या अर्थाने ऐतिहासिक ठरणार आहे. याचे वैशिष्ट्य म्हणजे आतापर्यंत येथील सेंट जॉर्जेस पार्कच्या मैदानावर झालेल्या चारही सामन्यांत भारताला पराभव पत्करावा लागला आहे. त्यामुळे मैदानावरील इतिहासाबरोबर दक्षिण आफ्रिकेतील मालिका विजयाचा इतिहास लिहिण्याची मोठी संधी विराट कोहलीच्या शिलेदारांसमोर उभी आहे. अर्थात, हे सर्व पावसावर अवलंबून असेल. उद्या येथे पावसाची शक्‍यता वर्तविण्यात आली आहे. 