अखेर जातीवाचक टिप्पणी केल्याबद्दल युवराजने माफी मागीतली

सकाळ वृत्तसेवा
Friday, 5 June 2020

युजवेंद्र चहलच्या एका टिकटॉक व्हिडीओबद्दल बोलत असताना युवराजने जातीवाचक आक्षेपार्ह शब्दांचा वापर केला होता.

भारतीय क्रिकेट संघाचा माजी ऑलराउंडर युवराज सिंह याचा एक जूना व्हिडीओ काही दिवसांपुर्वी सोशल मिडीयावर व्हायरल झाला होता. त्यामध्ये युजवेंजद्र चहलबद्दल बोलत असताना युवराजने जातीवाचक शब्द वापरल्याने युवराजला नेटकऱ्यांच्या नाराजीचा सामना करावा लागला होता. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर ट्विटरवरती #युवराज_सिंह_माफी_मांगो हा हॅशटॅग देखील ट्रेंड करत होता. 

"लॉकडाऊनमध्ये विराटने घरबसल्या कमावले कोट्यावधी रुपये!"

युवराजने रोहित शर्मासोबत इस्टाग्राम लाईव्ह दरम्यान बोलत असताना युजवेंद्र चहलचा विषय निघाला. युजवेंद्र चहलच्या एका टिकटॉक व्हिडीओबद्दल बोलत असताना युवराजने जातीवाचक आक्षेपार्ह शब्दांचा वापर केला होता. त्यानंतर त्याच्यावर हरीयाणा येथील हिसार जिल्ह्यात दलित अधिकार कार्यकर्ता आणि वकिल रजत कळसन यांनी गुन्हा दाखल केला आहे. त्यानंतर आज युवराजने स्वतःची बाजू मांडत झाल्या प्रकाराबद्दल माफी मागीतली आहे. 

 

 

युवराजने त्याच्या ट्विटर अकांउटवर यासंबंधी एक संदेश पोस्ट केला आहे त्या संदेशामध्ये त्याने झालेल्या प्रकारावरती दिलगीरी व्यक्त करत आहे. युवराजने पोस्ट केलेल्या संदेशामध्ये युवराजने लिहीलं की, “मी स्पष्टपणे सांगतो की मी कसल्याही जात, रंग, धर्म आणि लिंग यांच्या आधारावर करण्यात येणाऱ्या असमानतेवर विश्वास ठेवत नाही. माझ्या जीवनात मी कायम लोकांची मदत केली आहे आणि पुढेही करत राहीन.”

"अश्विनी पोनप्पा, लक्ष्य सेन यांच्यासह अन्य खेळाडूंचा बॅडमिंटन सराव सुरु"

त्यापुढे युवराजनं लिहीलं की, “मी कुठल्याही अपवादांशीवाय प्रत्येक व्यक्तीचा सन्मान करण्यावर विश्वास ठेवतो. मी माझ्या मित्राशी गप्पा मारत होतो, माझ्या बोलण्याचा गैरअर्थ काढण्यात आला आहे. तरी देखील अजाणतेपणे कोणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर मी माफी मागतो. देश आणि देशवासींयांवर माझं कायम प्रेम असेल.” 


​ ​

संबंधित बातम्या