सेरी ए फुटबॉल :  मिलानने सामन्यात जोरदार पुनरागमन करत बलाढ्य जुवेंटसला हरवले    

टीम ई-सकाळ
Wednesday, 8 July 2020

सामन्याच्या सुरवातीला जुवेंटस संघाने आक्रमक खेळी करत मिलानवर 2 - 0 ने बढत मिळवली होती. मात्र त्यानंतर मिलान संघाने चांगली कामगिरी करत जुवेंटसवर विजय मिळवला.

सेरी ए फुटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेमध्ये मिलान आणि जुवेंटस यांच्या दरम्यान झालेल्या सामन्यात मिलान संघाने जोरदार पुनरागमन करत जुवेंटस संघाला 4 - 2 ने पराभूत केले. सामन्याच्या सुरवातीला जुवेंटस संघाने आक्रमक खेळी करत मिलानवर 2 - 0 ने बढत मिळवली होती. मात्र त्यानंतर मिलान संघाने चांगली कामगिरी करत जुवेंटसवर विजय मिळवला.          

ऐतिहासिक सामन्यापूर्वी क्रिकेटपटूंचे ‘ब्लॅक लाईव्हज मॅटर’ ला समर्थन  

मिलान आणि जुवेंटस यांच्यातील सामन्यात जुवेंटसच्या एड्रियन रॅबिओट ने खेळाच्या 47 व्या मिनिटाला पहिला गोल केला. त्यानंतर ख्रिस्टीयानो रोनाल्डोने 53 व्या मिनिटाला दुसरा गोल करत संघाला आघाडी मिळवून दिली. मात्र ही आघाडी जुवेंटस संघाला दुसऱ्या सत्रात आली नाही. खेळाच्या दुसऱ्या सत्रात मिलानच्या इब्राहिमोविक ने 62 व्या मिनिटाला मिळालेल्या पेनल्टीचे रुपांतर गोल मध्ये केले. तर त्यानंतर फ्रॅंक केसी ने 66 व्या मिनिटाला दुसरा गोल नोंदवत जुवेंटसच्या संघाशी बरोबरी साधली. यानंतर राफेल लिओने लगेच पुढच्याच 67 व्या मिनिटाला तिसरा गोल करत इंटर मिलानला आघाडी मिळवून दिली. आणि यानंतर अँटे रेबिकने 80 व्या मिनिटाला चौथा गोल केला. त्यामुळे मिलान संघाने जुवेंटसवर 4 - 2 ने विजय मिळवला.          

जेसन होल्डर अजूनही जागतिक क्रिकेटमधील सर्वात अंडररेटेड खेळाडू - सचिन तेंडुलकर 
 
दरम्यान, सेरी ए फुटबॉल चॅम्पियनशिप मध्ये जुवेंटसचा संघ 31 सामन्यांमध्ये 75 गुण मिळवत गुणतालिकेत पहिल्या स्थानावर असून, लाझीओने 31 सामन्यात 68 गुण मिळवत दुसरे स्थान राखले आहे. तर इंटर मिलानचा संघ गुणतालिकेत तिसऱ्या क्रमांकावर असून, या संघाने 30 सामन्यांमध्ये 19 सामन्यात विजय मिळवत 64 गुण मिळवले आहेत. आणि  अटलांटा 63 गुणांसह चौथ्या स्थानावर, त्यानंतर मिलान संघाने 31 सामन्यांपैकी 14 सामन्यांमध्ये विजय मिळवत 49 गुणांसह पाचव्या स्थानावर झेप घेतली आहे.

 


​ ​

संबंधित बातम्या