लॉकडाऊनमध्ये वडिलांना घेऊन केला 1200 कि.मी. सायकल प्रवास! सायकलिंग फेडरेशने दिली विशेष ऑफर

सकाळ वृत्तसेवा
Friday, 22 May 2020

ज्योती आठ दिवसांमध्ये  गुरुग्राम ते दरभंगा प्रवास सायकलवर पुर्ण केला.

भारतात कोरोना व्हायरसचा फैलाव रोखण्यासाठी देशव्यापी लॉडाऊनची घोषणा करण्यात आल्या नंतर देशबरातील प्रवासी कामगारांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. अशा हजारो कामगारांप्रमाणेच 15 वर्षीय ज्योतीने गुरुग्रामपासून बिहरमधील दरभंगा हा जवळपास 1200 किमीचा प्रवास सायकलवर  वडिलांना सोबत घेऊनपुर्ण केला आहे. या अनोख्या कामगीरीसाठी भारतीय सायकलिंग फेडरेशन (सीएफआय) कडून ज्योतीला मोठी ऑफर देण्यात आली आहे. सीएफआयचे निर्देशक व्हि एन सिंह यांनी तीला चाचणीसाठी बोलावले असून जर ज्योतीने या चाचणीमध्ये चांगली कामगीरी दाखवली तर तीला भविष्यात विशेष प्रशिक्षण देण्यात येणार आहे. 

ज्योती लॉकडाऊनच्या काळात तिचे वडिल मोहन पासवान यांना सायकलवर सोबत घेत जवळपास हजार किमीचे अंतर आठ दिवसांमध्ये कापत गुरुग्रामते दरभंगा पोहचली आहे. एका दिवसात 100 ते 150 किमी अंतर सायकल चालवली आहे. सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडीयाचे निर्देशक व्ही एन सिंह यांनी ज्योतीला संधी देण्यात येणार असल्याचे सांगीतले आहे.“फेडरेशन नेहमीच प्रतिभावान खेळाडूंच्या शोधात असते, त्यामुळे जर ज्योतीमध्ये क्षमता असेल तर तीला सर्वोतपरी मदत केली जाईल.”असे सिंह यांनी सांगीतले आहे. 

“14-15 वर्षीच्या मुलीने वडिलांना मागे बसवून दररोज 100 किमी पेक्षा जास्त सायकल चालवणे नक्कीस सोपी गोष्ट नाही, खरंच ज्योतीने हा कारनामा केला असेल थर ती नक्कीच सक्षम आहे. त्यासाठी तीचे कौतुक झाले पाहिजे. सायकलिंगसाठी ती सक्षम आहे का याचा निर्णय चाचणी घेतल्यानंतर करण्यात येईल. शास्त्रीय पध्दतीने घेतलेल्या चाचणीमध्ये तपासलेल्या निकष तिने पार केले तर तीची नक्की निवड करण्यात येईल आणि तिची पुर्णपणे मदत करण्यात येईल.” असे सिंह यांनी नमूद केले. ज्योतीचे वडिल गुरुग्राम मध्ये रिक्षा चालवत पण अपघातानंतर त्यांचे काम सुटले, त्यादरम्यान कोरोना व्हायरसमुळे देशभरात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली. त्यामुळे ज्योतीने सायकलवरून गावी परत जाण्याचा निर्णय घेतला होता.
 


​ ​

संबंधित बातम्या