क्रिकेट

...अन तिने काढलेल्या पेंटिंगची सचिनने घेतली दखल 

भारतीय क्रिकेट संघाचा फलंदाज सचिन तेंडुलकरने 2013 मध्येच क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती घेतली. मात्र आज देखील क्रिकेट जगतात रमणारे अनेकजण सचिन तेंडुलकरचे मोठे चाहते आहेत. गॉड ऑफ क्रिकेट म्हणून ओळखला जाणारा सचिन तेंडुलकर देशभरासह संपूर्ण जगभरात सर्वच वयोगटातील लोकांमध्ये खूप लोकप्रिय आहे. शेकडो लोक सचिन तेंडुलकर वरील आपले प्रेम व्यक्त करण्यासाठी दररोज मास्टर ब्लास्टरला ईमेल, पत्रे आणि सोशल मीडियावर मेसेज पाठवतात. नुकतेच नांदेड येथील 7 वी मध्ये शिकत असलेल्या सृष्टीने सचिन तेंडुलकरचे सुरेख पेंटिंग काढत, त्याचा...

टेनिस

पालेर्मो लेडीज टेनिस ओपन स्पर्धेत फ्रान्सची फियोना फेरो विजयी  

कोरोनाजन्य परिस्थितीत पालेर्मो लेडीज टेनिस ओपन स्पर्धेत फ्रान्सच्या फियोना फेरो ने अंतिम फेरीत एस्टोनियाच्या चौथ्या मानांकित अ‍ॅनेट कोन्टाविटचा पराभव करत जेतेपदावर आपले नाव कोरले आहे. जागतिक क्रमवारीत 53 व्या क्रमांकावर असलेल्या फेरो ने काल रविवारी झालेल्या सामन्यात अ‍ॅनेट कोन्टाविटवर 6-2, 7-5 ने विजय मिळवला.  आयपीएल ही जगातील सर्वात मोठी क्रिकेट स्पर्धा - वसीम अक्रम अंतिम फेरीच्या प्रवासादरम्यान फ्रान्सच्या फियोना फेरो ने फक्त एकच सेट गमावला. या स्पर्धेच्या खिताबासोबतच 23 वर्षीय फियोनाने आपल्या...

फुटबॉल

चॅम्पियन्स लीग काही तासांवर, फुटबॉलचा उत्साह सुनासुना 

लिस्बन : कोरोना महामारीमुळे चॅम्पियन्स लीग फुटबॉल स्पर्धेतील उपांत्यपूर्व फेरीपासून सर्व लढती पोर्तुगालच्या राजधानीत होत आहेत. कोरोनाचा फटका बसलेल्या कालावधीतील ही सर्वांत महत्त्वाची स्पर्धा मानली जात आहे. पण लिस्बनमध्ये फेरफटका मारला तर याची जाणीवही होत नाही.  इंग्लंडचा क्रिकेटपटू म्हणतो, 'राहुल द्रविडच्या ई-मेलनं आयुष्याला कलाटणी मिळाली'  जगातील फुटबॉलच नव्हे, तर अब्जावधी क्रीडा रसिकांचे लक्ष उद्यापासून सुरू होणाऱ्या उपांत्यपूर्व लढतींकडे लागले आहे. चाहत्यांना स्टेडियममध्ये प्रवेश नसल्यामुळे...

बॅडमिंटन

पती कश्यपसह साईनाचा सराव; गोपीचंद अकादमीत काही आठवड्यानंतरच सराव सुरू...

हैदराबाद :  माजी जागतिक तसेच ऑलिंपिक पदकविजेत्या साईना नेहवालनेही सराव सुरू केला आहे. मात्र तिने सराव पती पारुपली कश्यपच्या साथीत सुरू केला आहे. साईनाचा सराव गोपीचंद अकादमी नजीकच्या संकुलात सुरू झाला आहे. ती काही आठवड्यानंतर गोपीचंद अकादमीत सरावास सुरुवात करणार आहे. साईना ऑलिंपिकला पात्र ठरण्याची संधी असल्याने तिला सरावास मंजुरी आहे. तिने पती कश्यप आणि आर. एम. व्ही. गुरुसाईदत्त यांच्यासह सरावास सुरुवात केली आहे. ``गोपीचंद अकादमीनजीकच्या केंद्रात सराव सुरू केला आहे. हा सराव प्राथमिक स्वरूपाचा आहे. CPL2020...

लोकल स्पोर्ट्स

शाळा बंद तरिही मुंबईत एवढ्या शाळा क्रीडा स्पर्धा खेळण्यास तयार

मुंबई : कोरोना महामारीमुळे लॉकडाऊन सुरू आहे. त्यामुळे शाळा कधी सुरू होणार, याबाबत अनिश्‍चितता आहे. त्यामुळे शालेय क्रीडा स्पर्धा या मोसमात होणार अथवा नाही, याबाबत संभ्रम होता. पण मुंबई शालेय क्रीडा संघटनेच्या स्पर्धांत सहभागी होण्यासाठी आत्तापर्यंत 92 शाळांनी प्रवेशिका पाठवल्या असल्यामुळे शालेय क्रीडा स्पर्धेस यंदाही चांगला प्रतिसाद लाभेल, अशी आशा बाळगली जात आहे.  गतमोसमात वीस क्रीडा स्पर्धांत एकंदर 47 हजार 803 खेळाडूंचा सहभाग होता. गतवर्षी 15 जुलैपासून फुटबॉलच्या स्पर्धा सुरू झाल्या होत्या. मुंबई शालेय...

इतर स्पोर्ट्स

मनदीपनंतर कोरोना पॉझिटिव्ह आढळलेल्या इतर पाचही खेळाडूंना दाखल केले...

भारतीय हॉकी संघाचा फॉरवर्ड मनदीप सिंगनंतर आता कोरोना पॉझिटिव्ह आढळलेल्या इतर पाच खेळाडूंना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. या पाचही खेळाडूंना खबरदारीचा उपाय म्हणून बंगळुरुच्या रुग्णालयात दाखल केले गेले असल्याचे भारतीय क्रीडा प्राधिकरणाने (साइ) आज बुधवारी स्पष्ट केले. याअगोदर मनदीप सिंगची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर त्याच्या शरीरातील ऑक्सिजनची पातळी कमी झाल्यामुळे, मनदीप सिंगला रूग्णालयात दाखल करण्यात आले होते.  आचारसंहितेचे उल्लंघन केल्यामुळे स्टुअर्ट ब्रॉडवर आयसीसीची कारवाई...