World Cup 2019 : वर्ल्डकपला अजून वेळ आहे, सध्या आरसीबीला जिंकवायचंय

वृत्तसंस्था
Wednesday, 17 April 2019

विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धा एका महिन्यानंतर सुरू होणार आहे. अजूनही मी रॉयल चॅलेंजर्स बंगळूरकडून खेळत आहे. त्यांच्या आगामी लढतीवरच सध्या माझे लक्ष केंद्रित आहे, असे युझवेंद्र चहल याने सांगितले. 

वर्ल्ड कप 2019 : मुंबई :विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धा एका महिन्यानंतर सुरू होणार आहे. अजूनही मी रॉयल चॅलेंजर्स बंगळूरकडून खेळत आहे. त्यांच्या आगामी लढतीवरच सध्या माझे लक्ष केंद्रित आहे, असे युझवेंद्र चहल याने सांगितले. 

युझवेंद्रच्या बंगळूरला आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सविरुद्ध हार पत्करावी लागली. सामन्यानंतर संघनिवडीबद्दल युझवेंद्रचे अभिनंदन करण्यात आले. तो पहिल्यांदाच विश्वकरंडक स्पर्धेसाठी निवडला गेला आहे. ही माझी पहिलीच स्पर्धा आहे. त्याबाबत मला कमालीचे औत्सुक्‍य आहे. विश्वकरंडक खेळण्याचे प्रत्येकाचे स्वप्न असते, असे त्याने सांगितले; पण त्याचवेळी विश्वकरंडक स्पर्धा अजून एक महिना दूर आहे, असेही सांगितले. 

चहल ला सध्या तरी विश्वकंरडक संघातील निवडीपेक्षा आयपीएलमधील संघाच्या कामगिरीबाबत जास्त चिंता आहे. सध्या माझे सर्व लक्ष आयपीएल लढतींवर आहे. अजूनही आमच्या सहा लढती शिल्लक आहेत. त्यात काहीही घडू शकते. आम्ही अजूनही प्ले ऑफला पात्र ठरू शकतो, असे त्याने सांगितले. 

संबंधित बातम्या