चुकीच्या हार्दिकला आमीर खान म्हणाला 'Good Night'

वृत्तसंस्था
Monday, 1 October 2018

ट्विटरवर हार्दिक पंड्याच्या एका फेक अकाउंटवरुन अभिनेता आमीर खानला goot night असे ट्विट करण्यात आले होते. त्यावर आमीर खानने हा खरा हार्दिक पंड्या नसल्याचे न कळल्याने त्याला शुभ रात्री अशी प्रतिक्रिया दिली. त्यावरुनच सोशल मीडियावर आमीर खानला सध्या चांगलेच ट्रोल करण्यात येत आहे.

मुंबई : भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्याला आशिया करंडकात पाठीला दुखापत झाल्याने त्याला स्पर्धेतून माघार घ्यावी लागली तर गुरुवारपासून होणाऱ्या वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेतही त्याला सहभागी होता येणार नाही. मात्र तो यामुळे नाही तर आमीर खानने त्याला ट्विटरवर 'Good Night' म्हटल्याने चर्चेत आला आहे. 

ट्विटरवर हार्दिक पंड्याच्या एका फेक अकाउंटवरुन अभिनेता आमीर खानला goot night असे ट्विट करण्यात आले होते. त्यावर आमीर खानने हा खरा हार्दिक पंड्या नसल्याचे न कळल्याने त्याला शुभ रात्री अशी प्रतिक्रिया दिली. त्यावरुनच सोशल मीडियावर आमीर खानला सध्या चांगलेच ट्रोल करण्यात येत आहे. 

संबंधित बातम्या