मेस्सीविनाही बार्सिलोनाचा धडाका कायम 

वृत्तसंस्था
Thursday, 25 October 2018

लंडन : लिओनेल मेस्सीच्या अनुपस्थितीत खेळतानाही बार्सिलोनाने चॅंपियन्स लीग फुटबॉलमध्ये सलग तिसरा विजय मिळवला आणि इंटर मिलानचा पाडाव केला; तर बोरुसिया डॉर्टमंडने ऍटलेटिको माद्रिदचा धुव्वा उडवला. मोहम्मद सलाहच्या दोन गोलमुळे लिव्हरपूलने रेड स्टार बेलग्रेडला पराजित केले; पण भरपाई वेळेतील गोलमुळे पीएसजीने नापोलीविरुद्धची हार टाळली. 

मेस्सीच्या दुखापतीमुळे संघात आलेल्या राफिन्हाने 32 व्या मिनिटास बार्सिलोनाचे खाते उघडले आणि त्यांनी 2-0 विजय मिळवत बाद फेरी जवळपास निश्‍चित केली. "मेस्सीच्या अनुपस्थितीत वाढलेली जबाबदारी प्रत्येक जण जाणून होता. आमच्या खेळाची खास शैली आहे. मेस्सीमुळे त्याचा दबदबा वाढला. तो राखण्याची जबाबदारी आहे,' असे बार्सिलोनाचे मार्गदर्शक एरनेस्टो वॅलवेद्रे यांनी सांगितले. 

डॉर्टमंडने युरो लीग विजेत्या ऍटलेटिकोविरुद्ध चार गोल करीत सर्वांना धक्का दिला. त्यांनी पूर्वार्धातील निसटत्या आघाडीनंतर उत्तरार्धात तीन गोल केले. ऍटलेटिकोच्या पराभवाच्या दुःखावर मोनॅको आणि क्‍लब ब्रुग यांच्या बरोबरीने फुंकर मारली गेली. यामुळे ऍटलेटिकोच्या बाद फेरीच्या आशा उंचावल्या. थिएरी हेन्‍री मार्गदर्शक असल्यामुळे मोनॅकोच्या कामगिरीकडे लक्ष आहे, त्यांना सलग बाराव्या लढतीत विजय लाभला नाही. 

सलाहच नव्हे; तर रॉबर्टो फिर्मिनो आणि सादिओ मॅने या लिव्हरपूलच्या तीनही प्रमुख आक्रमकांनी गोल केल्याने त्यांनी 4-0 बाजी मारली. सालाहने लिव्हरपूलकडून खेळताना गोलांचे अर्धशतकही पूर्ण केले. मारिओ रुईच्या स्वयंगोलमुळे पीएसजीने हार टाळली; तर अखेरच्या मिनिटांत पीएसव्ही एइंडोव्हेन याला गोलची संधी देत टॉटनहॅमने बाद फेरीच्या आशाच संपुष्टात आणल्या. 

संबंधित बातम्या