Asia Cup 2018 : कर्णधारपदाच्या बाबतीत मी म्हणजे दुसरा धोनीच 

वृत्तसंस्था
Saturday, 29 September 2018

क्रीडाविश्वातील सर्वोत्तम कर्णधारांमध्ये अजूनही धोनीची गणना केली जाते. आशिया करंडकात भारताचा कर्णधार असलेल्या रोहित शर्माने त्याच्यात आणि धोनीत साधर्म्य असल्याचे मत व्यक्त केले आहे.

दुबई : भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्व गुणांविषयी क्रीडाविश्वात कोणालाच शंका नाही. मैदानावर कठीण परिस्थितीतही डोके शांत ठेऊन कर्णधारपदाची जबाबदारी पार पाडण्यात धोनी वाकबगार होता. क्रीडाविश्वातील सर्वोत्तम कर्णधारांमध्ये अजूनही धोनीची गणना केली जाते. आशिया करंडकात भारताचा कर्णधार असलेल्या रोहित शर्माने त्याच्यात आणि धोनीत साधर्म्य असल्याचे मत व्यक्त केले आहे.

तो म्हणाला, ''मी अनेक वर्षे धोनीच्या नेतृत्वाखाली खेळलो आहे. तो कर्णधार असताना मी त्याला कधीच दडपण आलेले पाहिले नाही. तसेच त्याने कधीच कोणत्याही निर्णय घेताना जास्त विचार केला नाही. कर्णधारपदाच्या बाबतीत मीही काहीसा त्याच्यासारखाच आहे. आम्हा दोघांच्या नेतृत्वामध्ये बरेच साधर्म्य आहे. ''
कर्णधारपदाची जबाबदारी पार पाडताना धोनीकडून बरेच काही शिकायला मिळाल्याचेही त्याने नमूद केले. ''तो एक उत्तम कर्णधार असल्याने आम्ही नेहमीच त्याच्याकडून काही ना काही शिकत आलो आहोत. मैदानावर काहाही शंका असली तरी तो नेहमीच मदत करत आला आहे,'' असे मत त्याने व्यक्त केले. 

संबंधित बातम्या