विराटने केला अनुष्काचा 'खास' फोटो शेअर

वृत्तसंस्था
Thursday, 27 September 2018

नवी दिल्ली : आशिया करंडकात सहभागी न झालेला भारताचा कर्णधार विराट कोहलीने राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार मिळाल्यानंतर स्टार पत्नी अनुष्का शर्माचा खास फोटो शेअर केला आहे.

राष्ट्रपती भवनात झालेल्या कार्यक्रमात विराट कोहलीला खेलरत्न पुरस्कार देण्यात आला. यावेळी अनुष्का शर्माही उपस्थित होती. या क्रीडा पुरस्कार सोहळ्याला विराट आणि अनुष्काच्या उपस्थितीमुळे झळाळी मिळाली होती. विराटने पुरस्कार स्वीकारल्यानंतर पत्नीसोबत आनंद साजरा करतानाचा फोटो आणि एक संदेश सोशल मिडीयावर शेअर केला आहे.

विराटने म्हटले आहे, की जी व्यक्ती अनेक अडथळे येऊनही मला पुढे जाण्यासाठी कायम प्रेरित करते. तसेच माझ्या आयुष्यातील वेगवेगळ्या गोष्टींना योग्य करण्याचा प्रयत्न करते. जिच्यामुळे मी आतून बदललो आहे आणि मला खऱ्या प्रेमाची ताकद दाखवून दिली आहे. ''माझी ताकद, माझी जीवनसाथी.''

संबंधित बातम्या