विश्रांतीनंतरही कोहलीच अव्वल, रोहित दुसरा 

वृत्तसंस्था
Sunday, 30 September 2018

रोहित दुसऱ्यांदा दुसऱ्या स्थानी आला आहे. यापूर्वी याचवर्षी जुलै महिन्यात तो दुसऱ्या स्थानी होता. आशिया करंडक स्पर्धेचा मानकरी ठरलेला शिखर धवन पाचव्या स्थानावर आला आहे.

दुबई : "आयसीसी' एकदिवसीय क्रमवारीत फलंदाजीत पहिल्या दोन्ही क्रमांकांवर भारतीय खेळाडू आले आहेत. कर्णधार विराट कोहली अव्वल स्थानावर असून, आशिया करंडक क्रिकेट स्पर्धेनंतर रोहित शर्मा दुसऱ्या स्थानावर आला आहे.

रोहित दुसऱ्यांदा दुसऱ्या स्थानी आला आहे. यापूर्वी याचवर्षी जुलै महिन्यात तो दुसऱ्या स्थानी होता. आशिया करंडक स्पर्धेचा मानकरी ठरलेला शिखर धवन पाचव्या स्थानावर आला आहे. गोलंदाजीत कुलदीप यादव प्रथमच तिसऱ्या स्थानावर आला आहे. अष्टपैलू खेळाडूंच्या क्रमवारीत अफगाणिस्तानच्या रशिद खानने बांगलादेशाच्या शकिब अल हसनला मागे टाकत अव्वल स्थान पटकावले आहे.

सांघिक क्रमवारीत काही फरक पडलेला नाही. इंग्लंड आघाडीवर असून, भारत दुसऱ्या, न्यूझीलंड तिसऱ्या, तर दक्षिण आफ्रिका चौथ्या स्थानावर आहे. आशिया करंडक स्पर्धेतून भारताला एका, तर अफगाणिस्तानला पाच गुणांचा फायदा झाला. पाकिस्तान आणि श्रीलंका संघाला प्रत्येकी तीन गुण गमवावे लागले. 
 

संबंधित बातम्या