Asia Cup 2018 : पाकिस्तानचा संघ मैदानासह सोशल मीडियावरही ट्रोल 

वृत्तसंस्था
Thursday, 27 September 2018

पाकिस्तानच्या खराब खेळामुळे भारताने दोन्ही सामने एकतर्फी जिंकले. आशिया करंडकात केलेल्या खराब कामगिरीमुळे क्रिकेटप्रेमी पाकिस्तानच्या संघाला सोशल मीडियावर चांगलेच ट्रोल करत असल्याचे दिसून येत आहे.

अबुधाबी : पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यात झालेल्या सामन्यात बांगलदेशने बाजी मारत अंतिम सामन्यात प्रवेश निश्चित केला. पाकिस्तानने आशिया करंडकात फक्त दोन सामने जिंकले तर बांगलादेशविरुद्धच्या पराभवानंतर त्यांना मायदेशी परतावे लागले आहे. 

भारत आणि पाकिस्तान या पारंपारिक प्रतिस्पर्ध्यांमध्ये चाहत्यांना चुरशीच्या सामन्याची अपेक्षा होती मात्र, पाकिस्तानच्या खराब खेळामुळे भारताने दोन्ही सामने एकतर्फी जिंकले. आशिया करंडकात केलेल्या खराब कामगिरीमुळे क्रिकेटप्रेमी पाकिस्तानच्या संघाला सोशल मीडियावर चांगलेच ट्रोल करत असल्याचे दिसून येत आहे.

संबंधित बातम्या