इंग्लंडच्या माजी वर्ल्डकप मार्गदर्शकांकडे भारताची सूत्रे? 

वृत्तसंस्था
Tuesday, 9 April 2019

निवडीची आत्तापर्यंतची प्रक्रिया 
- एकंदर 250 अर्ज, त्यातून 125 जणांची निवड 
- भारतीय फुटबॉल महासंघाचे निकष धरून 80 जणांची निवड 
- या सर्व अर्जांची सखोल छाननी केल्यावर आता 35 उमेदवार रिंगणात 
- तांत्रिक समिती त्यातून आठ जणांची निवड करणार, त्यांची मुलाखत 
- महिनाअखेर मार्गदर्शकांची नियुक्ती जाहीर 

नवी दिल्ली : पाच वर्षे इंग्लंडचे मार्गदर्शक असलेले स्वेन गोरान एरिकसन भारताचे राष्ट्रीय मार्गदर्शक होण्यास उत्सुक आहेत. इंग्लंडचे पहिले परदेशी मार्गदर्शक असलेल्या एरिकसन यांच्यासह एकंदर 35 नावे भारतीय संघाच्या मार्गदर्शकपदाच्या शर्यतीत आहेत. 

एरिकसन 2006 पर्यंत इंग्लंडचे मार्गदर्शक होते. त्यांनी स्वीडन, पोर्तुगाल, इटलीतील क्‍लब संघांबरोबरच स्वीडन, पोर्तुगाल, इटली, इंग्लंड, फिलिपिन्स, मेक्‍सिको, आयव्हरी कोस्ट, थायलंड, अमिराती, चीन; तसेच फिलिपिन्स या दहा देशांच्या राष्ट्रीय संघांना मार्गदर्शन केले आहे. त्यांनी व्यवस्थापक म्हणून 18 विजेतेपदे जिंकली आहेत. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे 2002 आणि 2006 च्या विश्वकरंडक स्पर्धेच्या वेळी ते भारताचे मार्गदर्शक होते. 

अर्थात, केवळ एरिकसनच नव्हेत; तर भारतीय क्‍लब फुटबॉलमध्ये दबदबा निर्माण केलेल्या बंगळूर एफसीचे अल्बर्ट रोका, इंग्लंडचे टॉमी टेलर; तसेच ली क्‍लार्क, स्वीडनचे हाकेन एरिकसन, सर्बियाचे टॉमिस्लाव सिवीक, स्पेनचे ल्युकस अल्कारेझ यांनीही औत्सुक्‍य दर्शवले असल्याचे समजते. गेल्या काही वर्षांत भारताने जागतिक क्रमवारीत प्रगती केली आहे; त्यामुळे अनेक जण भारतीय संघाची सूत्रे घेण्यास उत्सुक आहेत. 
एरिकसन नावाजलेले असले, तरी आंतरराष्ट्रीय स्पर्धात फारसे यशस्वी नाहीत, याकडे लक्ष वेधले जात आहे. बंगळूर एफसीच्या रोका यांना देशांतर्गत फुटबॉलची चांगली जाण आहे. अल्कारेझ यांचा ला लीगामधील अनुभव मोलाचा ठरू शकेल. हाकेन एरिकसन यांनी मार्गदर्शन केलेल्या प्रत्येक संघाची कामगिरी उंचावली आहे. 

निवडीची आत्तापर्यंतची प्रक्रिया 
- एकंदर 250 अर्ज, त्यातून 125 जणांची निवड 
- भारतीय फुटबॉल महासंघाचे निकष धरून 80 जणांची निवड 
- या सर्व अर्जांची सखोल छाननी केल्यावर आता 35 उमेदवार रिंगणात 
- तांत्रिक समिती त्यातून आठ जणांची निवड करणार, त्यांची मुलाखत 
- महिनाअखेर मार्गदर्शकांची नियुक्ती जाहीर 

संबंधित बातम्या