चौकशी पूर्ण होईपर्यंत पंड्या-राहुल निलंबित 

वृत्तसंस्था
Friday, 11 January 2019

विराट कोहलीकडूनही समाचार 
दरम्यान, टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीनेही पंड्या आणि राहुल यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला. "महिलांबाबत आक्षेपार्ह विधानाचे संघ कधीही समर्थन देणार नाही. खेळाडूंच्या ड्रेसिंग रूममध्ये आम्ही अशा प्रकाराच्या विचारांना थारा देत नसतो. आपण काय बरळलो आहोत याची त्यांना जाणीव व्हायला हवी,' असे कोहली म्हणाला.

नवी दिल्ली : दूरचित्रवाणीवरील एका शोमध्ये महिलांबाबत आक्षेपार्ह विधान करणाऱ्या हार्दिक पंड्या आणि के. एल. राहुल यांच्यावर पुढील निर्णय होईपर्यंत निलंबित करण्याचा निर्णय प्रशासकीय समितीने घेतला आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मर्यादित षटकांच्या मालिकेतून हे दोघेही खेळाडू बाहेर असण्याची शक्‍यता आहे. त्यानंतर त्यांचा न्यूझीलंड दौराही धोक्‍यात येऊ शकतो. 

या दोघांना नव्याने कारणे दाखवा नोटीस बजावण्यात येईल. चौकशी पूर्ण होईपर्यंत हे दोघेही खेळाडू निलंबित असतील, असे प्रशासकीय समितीचे अध्यक्ष विनोद राय यांनी सांगितले. या दोघांच्या निलंबनाची मागणी प्रशासकीय समितीच्या सदस्या डायन एडल्जी यांनी आजच केली होती. 

या दोघांवरील शिक्षेसंदर्भात प्रशासकीय समितीचे सदस्य विनोद राय आणि डायन एडल्जी यांच्यात मतभेद होते. विनोद राय यांनी या दोघांवर दोन सामन्यांची बंदी घालावी असे सुचवले होते; तर या दोघांचे प्रकरण विधी समितीकडे द्यावे, अशी मागणी केली होती. एडल्जी यांनी आज भूमिकेत बदल करून चौकशी पूर्ण होईपर्यंत बंदी घालावी, असे मत मांडले होते. 

बीसीसीआयची अंतर्गत समिती की हंगामी लोकपाल या दोघांची चौकशी करणार हे अद्याप निश्‍चित झाले नाही. तसेच या दोघांना संघासोबत ठेवायचे की मायदेशी पाठवायचे, याबाबत संघ व्यवस्थापन प्रशासन समितीशी सल्लामसलत करत आहे. बहुतांशी मायदेशी पाठवण्याचाच निर्णय होण्याची दाट शक्‍यता आहे. तसे झाल्यास रिषभ पंत, मनीष पांडे किंवा श्रेयस अय्यर यापैकी दोघांना ऑस्ट्रेलियात पाठवले जाऊ शकते. 

विराट कोहलीकडूनही समाचार 
दरम्यान, टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीनेही पंड्या आणि राहुल यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला. "महिलांबाबत आक्षेपार्ह विधानाचे संघ कधीही समर्थन देणार नाही. खेळाडूंच्या ड्रेसिंग रूममध्ये आम्ही अशा प्रकाराच्या विचारांना थारा देत नसतो. आपण काय बरळलो आहोत याची त्यांना जाणीव व्हायला हवी,' असे कोहली म्हणाला.

संबंधित बातम्या