श्रीशांतवरील बंदी हटविली; पुन्हा क्रिकेट खेळणार?

वृत्तसंस्था
Friday, 15 March 2019

आयपीएल स्पर्धेत स्पॉट फिक्सिंग प्रकरणी दोषी ठरविण्यात आलेला भारतीय क्रिकेटचा वेगवान गोलंदाज एस श्रीशांतवरील बंदी आज सर्वोच्च न्यायलयाने हटविण्यात आली आहे. 

नवी दिल्ली : आयपीएल स्पर्धेत स्पॉट फिक्सिंग प्रकरणी दोषी ठरविण्यात आलेला भारतीय क्रिकेटचा वेगवान गोलंदाज एस श्रीशांतवरील बंदी आज सर्वोच्च न्यायलयाने हटविण्यात आली आहे. 

सर्वोच्च न्यायालयाने बीसीसीआयला श्रीशांतची बाजू ऐकून घेऊन त्यावर तीन महिन्यांमध्ये पुनर्विचार करण्याचे आदेश दिले आहेत. बीसीसीआयने त्याच्यावर आजीवन बंदी घातली होती. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने आज त्याच्या बंदीवर पुनर्विचार करण्याचा आदेश देण्यात आला आहे.  

राजस्थान रॉयल्स संघाकडून खेळणाऱ्या श्रीशांतला 2013मध्ये आयपीएलमध्ये स्पॉट फिक्सिंग केल्याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी त्याला अटक केली होती. त्यानंतर बीसीसीआयने त्याच्यावर आजीवन बंदी घातली आणि 10 लाख रुपयांचा दंड ठोठावला होता. गेल्या काही दिवसांपूर्वी त्याने पोलिसांच्या त्रासाला कंटाळून गुन्हा कबूल केल्याचे त्याने मान्य केले होते. 

संबंधित बातम्या