हाँगकाँग ओपनमधील श्रीकांतचे आव्हान संपुष्टात 

वृत्तसंस्था
Friday, 16 November 2018

भारताचा अव्वल टेनिसपटू किदांबी श्रीकांतला हाँगकाँग ओपन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत पराभवाचा सामना करावा लागला. जपानच्या केंटा निशिमोटोने त्याला 21-17, 21-13 असे सरळ सेटमध्ये पराभूत केले.

हाँगकाँग : भारताचा अव्वल टेनिसपटू किदांबी श्रीकांतला हाँगकाँग ओपन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत पराभवाचा सामना करावा लागला. जपानच्या केंटा निशिमोटोने त्याला 21-17, 21-13 असे सरळ सेटमध्ये पराभूत केले.  

केंटाने श्रीकांतला 43 मिनिटांत पराभूत करत उपांत्यफेरीत प्रवेश केला आहे. पहिल्या गेममध्ये दोघांमध्येही चुरशीची लढत पाहायला मिळाली. दोघेही 15-15 असे बरोबरीत असताना केंटाने आक्रमक खेळ करत 21-17 अशी आघाडी घेत पहिला गेम जिंकला. 

दुसऱ्या गेममध्ये मात्र केंटाने श्रीकांतला प्रतिकाराच्या जास्त संधी दिल्या नाहीत. सुरवातीपासूनच केंटाने या गेमवर वर्चस्व राखले. दुसरा गेम 21-13 असा जिंकत त्याने श्रीकांतचे आव्हान संपुष्टात आणले.  

संबंधित बातम्या