'बळीचा बकरा' मॅथ्यूजला श्रीलंकेने संघातूनच वगळले

वृत्तसंस्था
Wednesday, 26 September 2018

संघ : दिनेश चंडिमल (कर्णधार), उपुल थरंगा, सादिरा समरविक्रमा, निरोशान डिकवेला, धनंजय डिसिल्वा, दसुन शनाका, थिसरा परेरा, अकिला धनंजय, दुशमंता चामिरा, लसिथ मलिंगा, अमिला आपोन्सो, लक्षण संदाकन, नुआन प्रदीप, कसून रजिथा, कुशल परेरा. 

कोलंबो : आशिया करंडकातील अपयशी कामगिरीने कर्णधारपदावरून हकालपट्टी करण्यात आलेल्या एंजेलो मॅथ्यूजला इंग्लंड दौऱ्यासाठी श्रीलंका संघातूनही वगळण्यात आले आहे. 

संघाच्या अपयशाबाबत आपल्याला बळीचा बकरा बनविण्यात आल्याचे मॅथ्यूजचे म्हणणे होते. मात्र या वक्तव्याचा त्याला आणखी फटका बसला. त्याला इंग्लंड दौऱ्यातील पाच वन-डे आणि एकमात्र टी 20 सामन्यासाठी संघातून वगळण्यात आले. 

श्रीलंका क्रिकेट मंडळाने आज 15 सदस्यीय संघ जाहीर केला. दिनेश चंडिमल संघाचा कर्णधार असेल. 

संघ : दिनेश चंडिमल (कर्णधार), उपुल थरंगा, सादिरा समरविक्रमा, निरोशान डिकवेला, धनंजय डिसिल्वा, दसुन शनाका, थिसरा परेरा, अकिला धनंजय, दुशमंता चामिरा, लसिथ मलिंगा, अमिला आपोन्सो, लक्षण संदाकन, नुआन प्रदीप, कसून रजिथा, कुशल परेरा. 

संबंधित बातम्या