World Cup 2019 : संघ निवड झाली; आता चर्चा करुन काय फायदा?

वृत्तसंस्था
Wednesday, 17 April 2019

वर्ल्ड कप 2019 : नवी दिल्ली : विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेसाठी निवडलेला भारतीय संघ सर्वांत भक्कम असल्याची प्रतिक्रिया सलामीचा फलंदाज शिखर धवन याने व्यक्त केली आहे. निवड समितीने पंधरा सदस्यीय संघाची निवड करताना अष्टपैलू खेळाडूंना प्राधान्य देण्याची आल्याची चर्चा संघ निवडीनंतर सुरू होती. यष्टिरक्षक कार्तिकच्या समावेशाविषयीदेखील आश्‍चर्य व्यक्त करण्यात येत होते. 

धवन म्हणाला,"संघ निवडल्यानंतर चर्चा ही होत राहणार; पण विश्‍वकरंडकासाठी निवडण्यात आलेला संघ निश्‍चितच भक्कम आहे. सर्वच खेळाडू विश्‍वकरंडक खेळण्यास उत्सुक असतील. संघातील प्रत्येक जण विश्‍वकरंडक स्पर्धेत सर्वोत्तम कामगिरी करेल.'' 

यंदाच्या आयपीएलमधील कामगिरीविषयी बोलताना धवन म्हणाला, "प्रशिक्षक रिकी पॉंटिंग आणि सौरभ गांगुली यांच्या मार्गदर्शनाखाली संघ खूप चांगल्या प्रकारे घडत आहे. एखादा पराभव झाल्यास खचून न जाता खेळाडू दुसऱ्या सामन्यात जोमाने उतरत आहेत. यामुळेच सध्या दिल्ली दुसऱ्या स्थानावर आहे. नवे खेळाडू, नवे प्रशिक्षक, नवा सपोर्ट स्टाफ सगळेच नवे असले तरी, आमची कामगिरी नक्कीच समाधानकारक आहे.''

यंदाच्या आयपीएल स्पर्धेत धवनला शतकापासून वंचित रहावे लागले. याची खंत असली, तरी संघाचा विजय महत्त्वाचा असतो, असे सांगून धवन म्हणाला, "मी शतकाचा विचार केलाच नव्हता. सामना जिंकणे कधीही महत्त्वाचे असते. त्या वेळी स्थिती तशीच होती. आम्ही झटपट दोन विकेटस गमाविल्या होत्या. त्यामुळे जितक्‍या लवकर विजयावर शिक्कामोर्तब होईल तेवढे आम्हाला हवे होते. माझे शतक हुकले असले, तरी मी 97 धावा केल्या हे विसरता कामा नये. मी जर एकदा 97 धावा करू शकतो, तर याहीपेक्षा अधिक धावा करण्याची क्षमता मी राखून आहे.''
 
संबंधित बातम्या