Asia Cup 2018 : सर्वस्व पणाला लावून अंतिम सामना खेळू : शिखर धवन

सुनंदन लेले
Thursday, 27 September 2018

पाकिस्तानला पराभूत करून बांगलादेशचा संघ अंतिम सामन्यात आला आहे. तेव्हा त्यांना कमी लेखण्याचा प्रश्नच येत नाही. मला वाटते, कि नावाने पाकिस्तान संघ मोठा आहे, पण बांगलादेश संघाने चांगला खेळ करून मजल मारली आहे. यातून एकच समजते कि, कागदावरच्या नावांना किंमत नाही निर्णायक क्षणी जो उत्तम खेळ करून दाखवेल त्यालाच सर्वोत्तम संघ मानले जाईल. आम्ही सर्वस्व पणाला लावून अंतिम सामना खेळू कारण ही स्पर्धा आमच्याकरता महत्वाची आहे, असे भारताचा सलामीवीर शिखर धवनने म्हटले आहे.

दुबई- पाकिस्तानला पराभूत करून बांगलादेशचा संघ अंतिम सामन्यात आला आहे. तेव्हा त्यांना कमी लेखण्याचा प्रश्नच येत नाही. मला वाटते, कि नावाने पाकिस्तान संघ मोठा आहे, पण बांगलादेश संघाने चांगला खेळ करून मजल मारली आहे. यातून एकच समजते कि, कागदावरच्या नावांना किंमत नाही निर्णायक क्षणी जो उत्तम खेळ करून दाखवेल त्यालाच सर्वोत्तम संघ मानले जाईल. आम्ही सर्वस्व पणाला लावून अंतिम सामना खेळू कारण ही स्पर्धा आमच्याकरता महत्वाची आहे, असे भारताचा सलामीवीर शिखर धवनने म्हटले आहे.

आशिया करंडकात शुक्रवारी अंतिम फेरीत भारत आणि बांगलादेश यांच्यात लढत होणार आहे. बांगलादेशने पाकिस्तानचा पराभव करत अंतिम फेरीत स्थान मिळविले आहे. बांगलादेशच्या कामगिरीचे कौतुक करण्यात येत आहे.

या सामन्याविषयी शिखर म्हणाला, की भारतीय संघ उत्तम मनःस्थितीत आणि खेळाच्या लयीत आहे. मान्य करावे लागेल कि इंग्लंडच्या थंड हवेत खेळून इथे आल्यावर गरम हवेचा तडाखा सहन करणे कठीण गेले. ट्रेनरने आमची तयारी बरोबर करून घेतली होती म्हणून हा त्रास सहन करून चांगला खेळ करता आला आहे. काय करणार पापी पेट का सवाल है.

संबंधित बातम्या