Asia Cup 2018 : बांगलादेशला धक्का, 'हा' खेळाडू बाहेर

वृत्तसंस्था
Thursday, 27 September 2018

बांगलादेशचा अनुभवी अष्टपैलू खेळाडू शाकिब अल हसन याला दुखापतीमुळे भारताविरुद्धच्या अंतिम सामन्याला मुकावे लागणार आहे. तसेच 21 ऑक्टोबरपासून होणाऱ्या झिंबाब्वे दौऱ्यातील त्याच्या सहभागाबद्दलही साशंकता आहे. 

दुबई : बांगलादेशचा अनुभवी अष्टपैलू खेळाडू शाकिब अल हसन याला दुखापतीमुळे भारताविरुद्धच्या अंतिम सामन्याला मुकावे लागणार आहे. तसेच 21 ऑक्टोबरपासून होणाऱ्या झिंबाब्वे दौऱ्यातील त्याच्या सहभागाबद्दलही साशंकता आहे. 

जानेवारीमध्ये बांगलादेश, श्रीलंका आणि झिंबाब्वे यांच्यात झालेल्या तिरंगी मालिकेतील अंतिम सामन्यात शाकिबच्या डाव्या हाताला दुखापत झाली होती. सध्या सुरु असलेल्या आशिया करंडक स्पर्धेत त्याची दुखापत बळावली. अशातही तो पहिले चार सामने खेळला मात्र, त्यानंतर त्याची दुखापत वाढल्याने त्याला पाकिस्तानविरुद्धच्या सामन्याला मुकावे लागले. हा सामना झाल्यानंतर तो बुधवारी मायदेशी परतला. 

''त्याला चार ते सहा आठवड्यांची विश्रांती घ्यावी लागणार आहे. गेल्या काही दिवसात त्याला होणाऱ्या वेदनांमध्ये वाढ झाली. त्याने वेदनांसह सामने खेळताना दाखवलेल्या जिद्दीबद्दल मी त्याचे आभार मानतो. फिजिओने त्याला खेळता यावे यासाठी खूप प्रयत्न केले मात्र त्याच्या वेदना प्रचंड वाढल्याने त्याला पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यातून माघार घ्यावी लागली,'' असे स्पष्टीकरण बांगलादेश क्रिकेट महासंघाचे क्रिकेट ऑपरेशनचे अध्यक्ष अक्रम खान यांनी दिले.

संबंधित बातम्या