शाबाझ नदीमने 8 बळी घेत मोडला 20 वर्षांपूर्वीचा जागतिक विक्रम

वृत्तसंस्था
Thursday, 20 September 2018

चेन्नई : झारखंडचा फिरकीपटू शाबाझ नदीमने विजय हजारे करंडक क्रिकेट स्पर्धेत आठ बळी घेत प्रथम श्रेणी क्रिकेटपमधील 20 वर्षांपूर्वीचा विक्रम मोडीत काढला. त्याने या सामन्यात हॅट्ट्रिकही नोंदविली.

डावखुरा फिरकी गोलंदाज असलेला शाबाझने राजस्थानविरुद्धच्या सामन्यात 10 धावांमध्ये 8 बळी मिळविले. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये गेल्या 20 वर्षांपासून अबाधित असलेला जागतिक विक्रम त्याने मोडीत काढला. यापूर्वी हा विक्रम दिल्लीचा फिरकीपटू राहुल संघवी याच्या नावावर होता. त्याने हिमाचल प्रदेशविरुद्धच्या सामन्यात 15 धावा देत 8 बळी घेतले होते. संघवीने भारताकडून 2001 मध्ये एकमेव सामना खेळला होता.

शाबाझने 10 देत ही कामगिरी केली. त्याच्या गोलंदाजीमुळे राजस्थानचा डाव अवघ्या 73 धावांत आटोपला. झारखंडने हा सामना सात गडी राखून जिंकला. शाबाझने 20 व्या षटकात एम. के. लोमरोर, सी. डी. बिश्त आणि टी. एन. धिल्लन यांना बाद करत हॅट्ट्रिक नोंदविली.

या विक्रमानंतर शाबाझ म्हणाला, की मी जागतिक विक्रम मोडला आहे, हे काही जणांनी सांगितल्यानंतर मला कळाले. झारखंडकडून खेळताना मला आनंद वाटत आहे. संघाला विजय मिळवून देताना मला समाधान वाटते. माझ्या कामगिरीने मी समाधानी असून, हॅट्ट्रिक घेतली हे विशेष आहे.

संबंधित बातम्या