अफगाणिस्तानची अभिमानास्पद कामगिरी : सेहवाग 

वृत्तसंस्था
Wednesday, 26 September 2018

''अद्भूत! हा एक अविस्मरणीय सामना होता. हा टाय नेहमी लक्षात राहणार आहे. अफगाणिस्तानने सर्वांची मनं जिंकली आहेत. त्याच्या क्रिकेटच्या इतिहासातील हा एक अभिमानास्पद क्षण आहे,''

दुबई : भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात झालेल्या सामन्यात अफगाणिस्तानने अफलातून खेळ करत भारताला विजयापासून दूर ठेवले. या सामन्यात एकूण 504 धावांची बरसात होऊनही सामना बरोबरीत सुटला. या सामन्यानंतर सर्व स्तरातून अफगाणिस्तानच्या जिगरबाज खेळाचे कौतुक करण्यात आले. भारताचा माजी फलंदाज वीरेंद्र सेहवागनेही अफगाणिस्तानच्या संघाचे कौतुक करत ट्विट केले आहे. 

''अद्भूत! हा एक अविस्मरणीय सामना होता. हा टाय नेहमी लक्षात राहणार आहे. अफगाणिस्तानने सर्वांची मनं जिंकली आहेत. त्याच्या क्रिकेटच्या इतिहासातील हा एक अभिमानास्पद क्षण आहे,'' असे ट्विट सेहवागने केले आहे. 

अफगाणिस्तानचा सलमीवीर महंमद शेहजादचे तडाखेबाज शतक, महंमद नाबीचे वेगवान अर्धशतक, भारताची सुरेख सुरवात, मधल्याफळीने केलेला अडखळत खेळ तर राशिद खानचे सामन्याला कलाटणी देणारे शेवटचे षटक, या सर्व गोष्टी एकाच सामन्यात पाहायला मिळाल्या. दोन्ही संघांनी विजय मिळवण्याचा प्रयत्न केला मात्र सामना बरोबरीत सुटला.

संबंधित बातम्या