French Open Badminton : साईनाची धडाक्‍यात विजयी सलामी

वृत्तसंस्था
Wednesday, 24 October 2018

पॅरिस : भारताची अव्वल बॅडमिंटनपटू साईना नेहवालने फ्रेंच ओपन बॅडमिंटन स्पर्धेत धडाक्‍यात सलामी दिली आहे. पहिल्या लढतीत तिने जपानच्या साएना कावाकामी हिच्यावर सलग दोन सेटमध्ये सहज मात केली. 

पॅरिस : भारताची अव्वल बॅडमिंटनपटू साईना नेहवालने फ्रेंच ओपन बॅडमिंटन स्पर्धेत धडाक्‍यात सलामी दिली आहे. पहिल्या लढतीत तिने जपानच्या साएना कावाकामी हिच्यावर सलग दोन सेटमध्ये सहज मात केली. 

या सामन्यावर साईनाने पूर्ण वर्चस्व गाजविले. जागतिक क्रमवारीत 37 व्या क्रमांकावर असलेल्या कावाकामीला साईनाने या सामन्यात काहीही संधी दिली नाही. साईनाने 21-11, 21-11 असा थाटातच विजय मिळविला. हा सामना 37 मिनिटे चालला. दुसऱ्या फेरीमध्ये साईनाची लढत माजी जगज्जेती नोझोमी ओकुहारा हिच्याशी होईल. गेल्याच आठवड्यात झालेल्या डेन्मार्क ओपनमध्ये साईनाने ओकुहारावर मात केली होती. त्यामुळे या पुढील लढतीची उत्सुकता ताणली गेली आहे. 

साईनाला गेल्या काही दिवसांमध्ये भन्नाट सूर गवसला आहे. डेन्मार्क ओपनमध्येही ती अंतिम फेरीत दाखल झाली होती. 

पहिल्या सेटमध्ये साईनाने सुरवातीलाच 6-1 अशी आघाडी घेतली. दुसऱ्या 7-1 अशी आघाडी घेतली. पहिल्या सेटमध्ये सहज पराभव स्वीकारणाऱ्या कावाकामीने दुसऱ्या सेटमध्ये शेवटच्या टप्प्यात प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला.

दुसऱ्या सेटमध्ये एकवेळ साईना 13-5 अशी आघाडीवर होती. त्यानंतर कावाकामीने प्रतिकार करत ही पिछाडी 15-10 अशी कमी केली होती. पण साईनाने पुन्हा सामन्यावर वर्चस्व मिळवित दुसऱ्या सेटसह सामना खिशात घातला.

संबंधित बातम्या