साईनाच्या लग्नपत्रिका सोशल मीडियावर व्हायरल

वृत्तसंस्था
Thursday, 29 November 2018

सरत्या वर्षात गतवर्षाच्या तुलनेत सर्व बाबी विचारात घेतल्यास माझी कामगिरी चांगली झाली. काहींनी माझ्यासमोर आव्हान केले; पण त्यावर मात कशी करता येईल याची तयारी सुरू आहे. सध्या माझा केवळ सराव सुरू आहे आणि लग्नाच्या पूर्वतयारीत व्यस्त आहे. 
- साईना नेहवाल 

मुंबई/हैदराबाद : फुलराणी साईना नेहवाल आणि पारूपली कश्‍यप यांच्या विवाहाच्या स्वागत सोहळ्याच्या दोन पत्रिका सोशल मीडियावर व्हायरल झाल्या आहेत. दोन्ही पत्रिकांनुसार हा सोहळा 16 डिसेंबरला हैदराबादच्या नोवोटेल हॉटेलमध्ये 6.30 पासून होणार आहे.

दोन निमंत्रणपत्रिकांपैकी एक गुलाबी रंगाची आहे. त्यात साईनाचे आई-वडील (उषा राणी आणि डॉ. हरवीर सिंग) हे निमंत्रक असल्याचे म्हटले आहे, तर दुसरी निमंत्रण पत्रिकेत साईना आणि कश्‍यप हेच निमंत्रक आहेत. त्यात दोघांनीही आमच्या आई-वडिलांच्या आशीर्वादाने आम्ही विवाहबद्ध होत असल्याचा उल्लेख आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, साईना आणि कश्‍यपच्या विवाहाच्या स्वागत सोहळ्याचे निमंत्रणच दिले जाणार आहे. त्यांचा विवाह सोहळा पूर्णपणे खासगी स्वरूपाचा आहे आणि त्यासाठी केवळ शंभर व्यक्तीच निमंत्रित आहेत. स्वागत सोहळ्यास देशातील सर्व नामवंत क्रीडापटू उपस्थित राहणार असल्याची चर्चा आहे.

सरत्या वर्षात गतवर्षाच्या तुलनेत सर्व बाबी विचारात घेतल्यास माझी कामगिरी चांगली झाली. काहींनी माझ्यासमोर आव्हान केले; पण त्यावर मात कशी करता येईल याची तयारी सुरू आहे. सध्या माझा केवळ सराव सुरू आहे आणि लग्नाच्या पूर्वतयारीत व्यस्त आहे. 
- साईना नेहवाल 

संबंधित बातम्या