'सिंधूने आक्रमकतेची योग्य वेळ साधायला हवी'

वृत्तसंस्था
Friday, 23 November 2018

देशातील नवोदित गुणवान बॅडमिंटनपटूंना ऑलिंपिक तसेच जागतिक विजेते करण्याच्या उद्देशाने अत्याधुनिक हॅटसन बॅडमिंटन सेंटर सुरू करण्यात आले आहे. सलग सहावेळा ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धा जिंकणाऱ्या हार्टोनो यांनी नवोदितांना खेळाच्या टिप्स दिल्या. त्यात त्यांनी आपण सरासरी 10 रॅलीनंतर एक गुण जिंकणार असू, तर आपल्याला किमान दोनशे रॅली खेळल्यावर गेम जिंकता येईल.

तीर्थंगल (मदुराई) : बॅडमिंटनमधील यशासाठी आक्रमकता आवश्‍यक आहे, पण आक्रमकता म्हणजे केवळ स्मॅश, ड्रॉप्स नव्हेत. रॅलीमधील हुकूमत, खेळातील वैविध्य, त्यात शिताफीने केलेले बदल, हीसुद्धा एक प्रकारची आक्रमकता असते. पी. व्ही. सिंधूने हे आत्मसात करायला हवे, असे मत दिग्गज बॅडमिंटनपटू रुडी हार्टोनो यांनी व्यक्त केले. हॅटसन बॅडमिंटन सेंटरचे मेंटॉर असलेले हार्टोनो तीन दिवसांसाठी सेंटरमध्ये आले होते, त्यावेळी त्यांनी नवोदित बॅडमिंटनपटूंना आक्रमक होण्याचाच संदेश दिला.

देशातील नवोदित गुणवान बॅडमिंटनपटूंना ऑलिंपिक तसेच जागतिक विजेते करण्याच्या उद्देशाने अत्याधुनिक हॅटसन बॅडमिंटन सेंटर सुरू करण्यात आले आहे. सलग सहावेळा ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धा जिंकणाऱ्या हार्टोनो यांनी नवोदितांना खेळाच्या टिप्स दिल्या. त्यात त्यांनी आपण सरासरी 10 रॅलीनंतर एक गुण जिंकणार असू, तर आपल्याला किमान दोनशे रॅली खेळल्यावर गेम जिंकता येईल. हेच करायचे असेल, तर तेवढी तंदुरुस्ती उंचावणे आवश्‍यक आहे किंवा एका गुणासाठी दहाऐवजी पाच रॅलीमध्येच गुण कसा जिंकता येईल याकडे लक्ष द्यायला हवे. 

सिंधूविषयी बोलताना हार्टोनो म्हणाले, "सिंधू खूपच आक्रमक आहे. त्यामुळे प्रतिस्पर्ध्यांना तिचा खेळ माहिती झाला आहे. मी तिच्या आक्रमक खेळाविरुद्ध नाही; मात्र तिने योग्य वेळ साधायला हवी. ती काय करणार हे तिच्या प्रतिस्पर्ध्यांना आता कळले आहे. प्रतिस्पर्धी आघाडीवर गेल्यावर तिचे दडपण वाढते. सिंधू टोकियो ऑलिंपिकमध्ये सुवर्णपदकाची दावेदार आहे. त्यापासून ती एकच पायरी दूर आहे. त्या स्पर्धेच्यावेळी ती पंचवीशीत असेल. त्यावेळी सर्वोत्तम खेळच होत असतो', असे हार्टोनो यांनी सांगितले. 

श्रीकांतने यंदा एकही स्पर्धा जिंकली नाही, मग बिघडले कुठे. नवे वर्ष जास्त महत्त्वाचे आहे. त्यात ऑलिंपिकची पात्रता ठरणार आहे. ऑलिंपिकची पूर्वतयारी होणार आहे. माझ्या मते किती स्पर्धा जिंकता यापेक्षा कोणत्या महत्त्वाच्या स्पर्धा जिंकता हे महत्त्वाचे आहे. श्रीकांतच नव्हे तर साई प्रणीत, एच. एस. प्रणॉय यांनी क्षमतेनुसार खेळ करायला हवा.
- रुडी हार्टोनो

हार्टोनो यांचे बोल
- कोर्टवर झटपट विचार करून त्याची अंमलबजावणी महत्त्वाची.
- खेळाडूंना यासाठी तयार करणे ही मार्गदर्शकांची जबाबदारी.
- योग्य तसेच महत्त्वाच्या स्पर्धांची निवडही महत्त्वाची तसेच ब्रेक कधी हेही ठरवायला हवे.
- जागतिक, ऑलिंपिक विजेते नवोदितातून घडवण्यासाठी 10 वर्षे लागतात, किमान पाच वर्षे तरी नक्कीच.
- प्रशिक्षण कार्यक्रमात योग्य मार्गदर्शनाबरोबरच क्रीडा शास्त्राची योग्य मदत; तसेच उत्तम आहारही तितकाच महत्त्वाचा.
- चीनप्रमाणेच भारताची लोकसंख्याही जास्त, त्यातून सतत विजेते घडतात, मग भारतात का नाही.

संबंधित बातम्या