World Cup 2019 : एमएसकेंवर टीकेनंतरही रायुडूला राखीव खेळाडूंमध्ये स्थान 

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 17 April 2019

वर्ल्ड कप 2019 : नवी दिल्ली : विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेसाठी इंग्लंडला जाणाऱ्या संघात रिषभ पंत आणि अंबाती रायडू यांची अंतिम संघात निवड झालेली नसली तरी त्यांच्यासाठी अजून सर्व काही संपलेले नाही. बीसीसीआयने बुधवारी त्यांची राखीव खेळाडू म्हणून निवड केली आहे. वेगवान गोलंदाज नवदीप सैनी हा तिसरा राखीव खेळाडू आहे. 

वर्ल्ड कप 2019 : नवी दिल्ली : विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेसाठी इंग्लंडला जाणाऱ्या संघात रिषभ पंत आणि अंबाती रायडू यांची अंतिम संघात निवड झालेली नसली तरी त्यांच्यासाठी अजून सर्व काही संपलेले नाही. बीसीसीआयने बुधवारी त्यांची राखीव खेळाडू म्हणून निवड केली आहे. वेगवान गोलंदाज नवदीप सैनी हा तिसरा राखीव खेळाडू आहे. 

सोमवारी जाहीर करण्यात आलेल्या 15 खेळाडूंच्या संघात पंत आणि रायडू यांना स्थान न मिळाल्यानंतर माजी खेळाडूंनी नाराजी व्यक्त केली होती. सुनील गावसरकर यांनी पंतला वगळण्यावरून आश्‍चर्य व्यक्त केले होतेत तर गौतम गंभीरने रायडूला न घेण्यावरून प्रश्‍नचिन्ह निर्माण केले होते. 
आयसीसीच्याच चॅम्पियन्स करंडक स्पर्धेप्रमाणे आम्ही विश्‍वकरंडक स्पर्धेसाठी रिषभ पंत, अंबाती रायडू असे प्राधान्य क्रमाने आणि नवदीप सैनी असे तीन राखीव खेळाडू निवडले आहेत. मुख्य संघातील कोणी दुखापतग्रस्त झाला तर या राखीव खेळाडूंना स्थान देण्यात येईल, असे बीसीसीआयच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्याने सांगितले. 

टीकेनंतरही रायडू राखीव खेळाडूंत 
सोमवारी संघ जाहीर होताच रायडूने खोचक टीका केली होती. विजय शंकरकडे त्रिकोणीय क्षमता असल्यामुळे त्याची निवड करण्यात आली असे, निवड समितीचे अध्यक्ष एमएसके प्रसाद यांनी मतप्रदर्शन केले होते. त्यांच्या या वक्तव्यावर रायडूने विश्‍वकरंडक स्पर्धेतील कामगिरी पहाण्यासाठी मी "थ्रीडी' चष्मे मागवले आहेत, असे ट्‌विट केले होते. त्यानंतरही प्रसाद यांच्या निवड समितीने रायडूला राखीव खेळाडूंत स्थान दिले आहेत. 

खलील अहमद, अवेश खान आणि दीपक चहर हे सरावासाठीचे गोलंदाज म्हणूनच इंग्लंडला जाणार आहे. हे तिघे राखीव गोलंदाज नसतील. पण फलंदाज बदलण्याची वेळ आली तर पंत किंवा रायडू यांना पसंती दिली जाईल, असे बीसीसीआयच्या या पदाधिकाऱ्याने स्पष्ट केले. 

यो यो चाचणी नाही 
संघात निवडलेल्या खेळाडूंची यो यो चाचणी घेण्यात येणार नाही. 12 मे रोजी आयपीएल संपत आहे आणि काही दिवसातच भारतीय संघ इंग्लंडला रवाना होईल त्यामुळे ही चाचणी होणार नाही. आयपीएल मध्यावर आलेली आहे. त्यानंतर यो यो चाचणी घेतली तर निकाल कमी जास्त होऊ शकतो, असेही या पदाधिकाऱ्याने स्पष्ट केले. 
 

संबंधित बातम्या