राजमल्हार व्हटकरची भारतीय वुशु संघात निवड 

सकाळ वृत्तसेवा
Monday, 18 February 2019

कोल्हापूर - रशिया येथे होणाऱ्या मॉस्को वुशु स्टार्स 2019 आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी राजमल्हार महेश व्हटकरची भारतीय संघात निवड झाली. थर्टी टू तायजीकॉन वीथ स्वोर्ड, फोर टी टू तायजीकॉन, ऑप्शनल तायजीकॉन प्रकारात तो भारताचे प्रतिनिधीत्व करणार आहे. 22 फेब्रुवारीपासून स्पर्धेला सुरवात होईल.

सप्टेंबर 2018 मध्ये बल्गेरिया येथे झालेल्या तिसऱ्या तायजीकॉन वर्ल्ड चॅम्पियनशीपमध्ये फोर टी टू तायजीकॉन मेन्स ग्रुप डी या प्रकारात त्याने कास्यपदक मिळविले होते. आतापर्यंत जिल्हा, राज्य, राष्ट्रीयस्तरावर सुवर्ण, रौप्य, कास्यपदके मिळविली आहेत. भारतीय संघात स्थान मिळविण्यासाठी चीनमधील शॉंगडॉंग क्रीडा विद्यापीठात वुशु खेळाचे त्याने विशेष प्रशिक्षण घेतले.

स्पोर्टस्‌ ऍथोरिटी ऑफ इंडियाच्या भोपाळ येथे 50 दिवसाचे राष्ट्रीय प्रशिक्षण शिबीर पूर्ण केले. भारत सरकारकडून घेतलेल्या विविध निवड चाचण्या यशस्वीपणे पूर्ण केल्या. राजमल्हार सध्या पुणे येथील एस. के. स्पोर्टस्‌ फाऊंडेशन येथे सराव करत आहे. भारतीय वुशु फेडरेशनचे सचिव सुहेल अहमद, प्रशिक्षक एस. एस. कटके यांचे मार्गदर्शन लाभले. 

संबंधित बातम्या