राहुल, विजयच्या खेळाने पुणे संघाने साधली बरोबरी 

सकाळ वृत्तसेवा
Monday, 5 November 2018

पुणे संघाची सुरवात तशी निराशाजनक झाली होती. दत्ता नराले, जाबुर्यन मिहरन यांनी पहिल्या दोन्ही लढती जिंकून मराठवाडा संघाला 2-0 अशी आघाडी मिळवून दिली होती. त्यानंतर विनोद कुमारने विजय मिळवून पुण्याचे खाते उघडले. पण, महिलांच्या लढतीत त्यांना पुन्हा एकदा हार मानावी लागली. मराठवाडा संघाच्या स्वाती शिंदेने पुण्याच्या वृषाली पाटीलचा पराभव करून मराठवाडा संघाला 3-1 असे आघाडीवर नेले. 

पुणे : आंतरराष्ट्रीय मल्ल राहुल आवारे आणि ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांच्या चतुरस्र खेळाने महाराष्ट्र कुस्ती दंगलमध्ये पुणेरी उस्ताद संघाने वीर मराठवाडा संघाचे आव्हान 3-3 असे बरोबरीत सोडवले. 

पुणे संघाची सुरवात तशी निराशाजनक झाली होती. दत्ता नराले, जाबुर्यन मिहरन यांनी पहिल्या दोन्ही लढती जिंकून मराठवाडा संघाला 2-0 अशी आघाडी मिळवून दिली होती. त्यानंतर विनोद कुमारने विजय मिळवून पुण्याचे खाते उघडले. पण, महिलांच्या लढतीत त्यांना पुन्हा एकदा हार मानावी लागली. मराठवाडा संघाच्या स्वाती शिंदेने पुण्याच्या वृषाली पाटीलचा पराभव करून मराठवाडा संघाला 3-1 असे आघाडीवर नेले. 

या स्थितीत अखेरच्या दोन लढतींचे महत्त्व वाढले होते. त्या वेळी राहुल आवारे आणि विजय चौधरी या पुण्याच्या हुकमी मल्लांनी अपेक्षित कामगिरी केली. राहुलने 65 किलो वजनी गटात शुभम थोरातला संधीही दिली नाही. मोळी डावाचा सुरेख वापर करून त्याने सलग सहा गुण मिळवत घेतलेली आघाडी वाढवत 10-2 असा विजय मिळविला.

अखेरच्या 85 किलोपेक्षा अधिक वजनी गटाच्या लढतीत विजयला पुण्याचा "वादळी मल्ल' अशी ओळख असलेल्या किरण भगतने जबरदस्त आव्हान दिले. रंगतदार झालेल्या लढतीत विजयने अखेरच्या सत्रात आक्रमक कुस्ती करून 6-3 असा विजय मिळवून पुण्याला बरोबरी साधून दिली. या सामन्याची मानकरी म्हणून मराठवाडा संघाच्या स्वाती शिंदेची निवड करण्यात आली. 

संबंधित बातम्या