शर्यतीपूर्वी काही दिवस सराव कमी, वजन जास्त असावे

निखिल शहा
Wednesday, 5 December 2018

आज हे करा
- 5 ते 10 मिनिटे वॉर्म-अप
- 20 मिनिटे झपझप चालणे-धावणे
- 5 ते 10 मिनिटे स्ट्रेचिंग

मॅरेथॉन होते त्या आठवड्यात आपण सराव सुरू ठेवणे महत्त्वाचे असते. रविवारी शर्यत असेल, तर शनिवारी विश्रांती घ्या. शुक्रवारपर्यंत मात्र सराव सुरू ठेवा. प्रत्यक्ष शर्यतीत तुम्ही जे अंतर धावणार आहात, नेमके तेवढे सरावात धावला नाहीत तरी हरकत नाही. सरावाने सज्ज झाल्यास तुम्ही शर्यतीच्या दिवशी फिनिश लाइन गाठू शकता. धावपटू नेहमीच म्हणतात की स्टार्ट लाइनला तुम्ही सज्ज होता त्यापूर्वीचे काही दिवस सराव थोडा कमी आणि वजन थोडे जास्त असलेले केव्हाही चांगले, कारण त्यादिवशी तुम्ही राखीव एनर्जी पणास लावू शकता.

या कालावधीत तुम्ही झोपेला प्राधान्य द्या. म्हणजे असे, की झोपेचे वेळापत्रक पाळा. बाहेरचे खाद्यपदार्थ खाऊ नका. या कालावधीत वर्कआउट सुरू असल्यामुळे शरीर भक्कम होण्याची प्रक्रिया होत असते. जंक फूड खाऊन शरीरावर ताण पडू देऊ नका. त्याद्वारे तुम्हाला संसर्ग होण्याचाही धोका असतो.

पोहणेसुद्धा उपयुक्त ठरते, त्यामुळे किरकोळ दुखापती परिणामकारकरीत्या बऱ्या होतात. धावताना शरीराची स्थिती, सरळ समोर पाहणे, खांद्यावरील डोक्‍याची स्थिती, मांड्यांची हालचाल अशा अनेक गोष्टींवर तुमचा कटाक्ष हवा. खाली पाहायचे असेल तर नजर खाली न्या, डोके-मान हलवू नका, कोपराची हालचाल 90 अंश कोनात व्हायला हवी, हाताच्या मुठी हळुवार धरा (जणू काही तुमच्या हातात फुलपाखरूच आहे).. या सर्व गोष्टी आपण सुरवातीला लक्षात घेतल्या आहेत. त्याची उजळणी करा. अर्थात धावूनच.

आज हे करा
- 5 ते 10 मिनिटे वॉर्म-अप
- 20 मिनिटे झपझप चालणे-धावणे
- 5 ते 10 मिनिटे स्ट्रेचिंग
(लेखक मॅरेथॉनपटू, संयोजक व मार्गदर्शक आहेत.)

संबंधित बातम्या