कुस्तीमध्ये महाराष्ट्राच्या प्रविण पाटीलचे सोनेरी यश 

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 10 January 2019

 कुस्तीत महाराष्ट्राच्या प्रवीण पाटील याने आपल्या चाहत्यांच्या अपेक्षा पूर्ण करताना सुरेख कौशल्य दाखविले आणि सोनेरी कामगिरी केली. ग्रीकोरोमन प्रकाराच्या लढतींमध्ये महाराष्ट्राने एक सुवर्ण, दोन रौप्य व दोन ब्रॉंझ अशी पाच पदके मिळविली.

पुणे : कुस्तीत महाराष्ट्राच्या प्रवीण पाटील याने आपल्या चाहत्यांच्या अपेक्षा पूर्ण करताना सुरेख कौशल्य दाखविले आणि सोनेरी कामगिरी केली. ग्रीकोरोमन प्रकाराच्या लढतींमध्ये महाराष्ट्राने एक सुवर्ण, दोन रौप्य व दोन ब्रॉंझ अशी पाच पदके मिळविली. त्याने वषार्खालील गटाच्या किलो वजनी विभागात हे यश मिळविताना हरयाणाच्या ललितकुमार याच्यावर सहज मात केली. 

मूळचा कोल्हापूर येथील रहिवासी असलेल्या या खेळाडूने संदीप वांजळे यांच्याकडून कुस्तीचे बाळकडू घेतले आहे. त्यानंतर त्याने बॉम्बे इंजिनिअरींग ग्रुप बॉईजमध्ये प्रशिक्षण घेतले आहे. सध्या तो बरेली येथील जाट रेजिमेंटमध्ये सराव करतो. 

महाराष्ट्राच्या ज्ञानेश्वर देसाई व पृथ्वीराज खडके यांना रौप्यपदक तर अमृत रेडेकर व कुंदनकुमार यांनी ब्रॉंझपदक मिळाले. ज्ञानेश्वर याने किलो गटात मणीपूरच्या खुंदोमसिंग लोयनगम्बा याच्याकडून - असा पराभव स्वीकारला. खुंदोमसिंग याने आशियाई शालेय क्रीडा स्पर्धेत ब्रॉंझपदक मिळविले होते. साहजिकच त्याचे पारडे जड मानले जात होते. तथापि ज्ञानेश्वार याने त्याला चिवट लढत दिली. दोन्ही खेळांडूंनी सुरुवातीला सुरेख डावपेच टाकण्याचा प्रयत्न केला. 

खुंदोमसिंग याचा उजवा हात दुखावला मात्र त्याने आपली आघाडी कायम ठेवीत ही लढत जिंकली. लहानपणीच त्याने आईवडिलांचे आकस्मिक निधन झाल्यानंतर त्याच्या काकांनीच त्याचा सांभाळ केला. त्याच्याकडील कुस्तीचे नैपुण्य लक्षात घेऊन त्याला इंफाळ येथील भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या अकादमीत प्रशिक्षणासाठी प्रवेश देण्यात आला. तेथील प्रशिक्षणाच्या आधारे त्याने आतापर्यंत अनेक राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा गाजविल्या आहेत. ज्ञानेश्वार हा त्याच्या समवेत राष्ट्रीय शिबिरात सराव करीत असल्यामुळे त्याच्या कौशयाचा खुंदोमसिंग याने सखोल अभ्यास केला होता. 

पृथ्वीराज याला किलो गटात दिल्लीच्या रमेश पुनिया याच्याविरुद्ध फारसा प्रभाव दाखविता आला नाही. वषार्खालील गटाच्या या लढतीमधील पहिल्याच फेरीत रमेश याने त्याला चीत करीत निर्विवाद वर्चस्व गाजविले. महाराष्ट्राच्या अमृत रेडेकर याला वषार्खालील किलो गटात ब्रॉंझपदक मिळाले. तो कोल्हापूरचा रहिवासी असून बेळगाव येथील आर्मी बॉईज स्कूलमध्ये सराव करतो. आर्मी स्पोटर्स्‌ इन्स्टिट्युटचा खेळाडू कुंदनकुमार याला वषार्खालील किलो गटात ब्रॉंझपदक मिळाले. 
 

 
 

संबंधित बातम्या