चांदा ते बांदा, पोलिस दादांचाही धावण्याशी वादा! 

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 5 December 2018

दृष्टिक्षेपात 
- 21 किमी हाफ मॅरेथॉनसाठी 28 संघ 
- प्रत्येकी चार याप्रमाणे एकूण संख्या 112 
- पुणे विभागातील पोलिस 75, इतर 37 
- मुंबई, रत्नागिरी, सोलापूर, नागपूर, सीआयडी, मुंबई क्‍युआरटी, हिंगोलीचा समावेश 
- दहा किमी शर्यतीसाठी 108 संघ 
- प्रत्येकी चारप्रमाणे एकूण संख्या 428 
- पुणे विभागातील 247, इतर 181 
- एसआरपीएफ, गडचिरोली, जळगाव, बीड, सोलापूर, सांगली, अमरावती येथूनही सहभाग 

 

पुणे : गणेशोत्सवासह विविध सणवार आणि अनेकविध सामाजिक-सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी बंदोबस्ताची "ड्यूटी' बजावणारे पोलिस नऊ डिसेंबर रोजी वेगळा अनुभव घेण्यास सज्ज होत आहेत. बजाज अलियांझ पुणे हाफ मॅरेथॉनमधील पोलिस कमिशनर कपसाठी मुंबई, कोकणापासून गडचिरोलीपर्यंत प्रतिसाद लाभला आहे. 

त्या दिवशी पुणेकरांनी तंदुरुस्तीचा जागर करावा, अशा आवाहनास अभूतपूर्व प्रतिसाद लाभला आहे. यातील पोलिस कमिशनर कप राज्यातच नव्हे, तर देशात प्रथमच होत आहे. त्यासाठी पुण्यासह राज्यभरातील पोलिसांनी नावनोंदणी केली. 

दृष्टिक्षेपात 
- 21 किमी हाफ मॅरेथॉनसाठी 28 संघ 
- प्रत्येकी चार याप्रमाणे एकूण संख्या 112 
- पुणे विभागातील पोलिस 75, इतर 37 
- मुंबई, रत्नागिरी, सोलापूर, नागपूर, सीआयडी, मुंबई क्‍युआरटी, हिंगोलीचा समावेश 
- दहा किमी शर्यतीसाठी 108 संघ 
- प्रत्येकी चारप्रमाणे एकूण संख्या 428 
- पुणे विभागातील 247, इतर 181 
- एसआरपीएफ, गडचिरोली, जळगाव, बीड, सोलापूर, सांगली, अमरावती येथूनही सहभाग 

टेकडीवर आली पोलिस तुकडी! 
पोलिसांच्या संघात शीघ्र प्रतिसाद दलाचे (क्विक रिस्पॉन्स टीम) जवान जोरदार तयारी करीत आहेत. याविषयी विशेष शाखेचे पोलिस उपायुक्त अशोक मोराळे यांनी सांगितले, की "पोलिस कमिशनर कप'चे वृत्त वाचून आमचे अनेक जवान धावण्यासाठी उत्सुक झाले आहेत. शीघ्र प्रतिसाद पथकातील नियुक्तीमुळे ते तंदुरुस्तीसाठी सक्रिय असतातच. या शर्यतीत चार जणांचा संघ असणार आणि वैयक्तिक कामगिरीसुद्धा बक्षिसासाठी ग्राह्य धरली जाणार आहे. स्पर्धेचे हे स्वरूप वेगळे आहे, त्यामुळे सराव करतानासुद्धा छान वाटते. 

या पथकातील जवान धावण्याची क्षमता वाढावी म्हणून वेगवेगळ्या प्रकारचा सराव करीत आहेत. यासाठी दोन दिवसांपूर्वी वेताळ टेकडी चढून त्यांनी पीटी आणि परेड केली. हा अनुभव कसा होता आणि तेव्हा तेथे फिरायला आलेल्यांची काय प्रतिक्रिया होती, या प्रश्नावर मोराळे म्हणाले, की आमच्यापैकी अनेक जण एकटे किंवा दोघे-तिघे पूर्वी काही टेकड्यांवर गेले होते. आता एका उद्देशासाठी गेलो तेव्हा छान वाटले. मुख्य म्हणजे पोलिस आले आहेत आणि ते कवायती करीत आहेत हे पाहून सामान्य नागरिकांना कुतूहल वाटले आणि त्यांनी कौतुकही केले. नऊ डिसेंबरपूर्वी आम्ही राम टेकडीवर जाणार आहोत. सिंहगड चढून आमची तयारी पूर्णत्वास येईल. 

पोलिस भरतीसाठी तीन व पाच किलोमीटर धावण्याची चाचणी असते. त्यानंतर ट्रेनिंगमध्येही धावण्याचा समावेश असतो. नियुक्तीनंतरही बरेच पोलिस धावतात. अशावेळी शर्यतीत भाग घ्यायचा म्हणून धावताना काय वाटते, त्याचे काय फायदे जाणवले, याविषयी ते म्हणाले, की आमच्यापैकी अनेक जण रोज ट्रॅकला काही फेऱ्या मारायचे. एके दिवशी 21 किलोमीटर आणि तेही शर्यतीत धावू शकू असे कुणाला कदापि वाटले नव्हते, त्यामुळे प्रत्येकालाच आपल्या क्षमतेची नव्याने अनुभूती आली.

संबंधित बातम्या