आता पाकिस्तानातही क्रिकेटचे सामने होणार?

वृत्तसंस्था
Monday, 18 March 2019

आंतरराष्ट्रीय क्रिकेट महासंघाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डेव्हिड रिचर्डसन यांनी पाकिस्तानची 'धोकादायक देश' अशी प्रतिमा हळू हळू बदलत चालली आहे असे मत व्यक्त केले आहे. रिचर्डसन यांच्या कालावधीत त्यांनी पाकिस्तानात क्रिकेटचे पुनरुज्जीवन करण्याचे खूप प्रयत्न केले आहेत.

कराची : आंतरराष्ट्रीय क्रिकेट महासंघाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डेव्हिड रिचर्डसन यांनी पाकिस्तानची 'धोकादायक देश' अशी प्रतिमा हळू हळू बदलत चालली आहे असे मत व्यक्त केले आहे. रिचर्डसन यांच्या कालावधीत त्यांनी पाकिस्तानात क्रिकेटचे पुनरुज्जीवन करण्याचे खूप प्रयत्न केले आहेत. 

''येत्या वर्षात पाकिस्तानमध्ये क्रिकेटचे पुनरुज्जीवन करण्याला आयसीसी सर्वाधिक प्राधान्य देणार आहे,'' असे मत त्यांनी व्यक्त केले. येत्या वर्षात रिचर्डसन यांचा कार्यकाळ संपणार आहे. त्यांच्यानंतर भारताचे मनु सोहनी हे आयसीसीच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्य़ाची भूमिका बजावतील. 

''पाकिस्तानने गेल्या काही काळात केलेली प्रगती आपल्याला मान्य करायला लागेल. ते 'धोकादायक देश' अशी प्रतिमा पुसून टाकण्याचा प्रयत्न करत आहे आणि यात नक्कीच हळूहळू बदल होत आहे. अनेक खेळाडू पाकिस्तानात येऊन खेळण्यास तयार झाले यावरुन हे सिद्ध होते,'' असे मत त्यांनी व्यक्त केले आहे. 

संबंधित बातम्या