'त्या' पाकिस्तानी खेळाडूंनी ओखळले भारताचे महत्व 

शैलेश नागवेकर
Wednesday, 30 January 2019

पाकिस्तानी राज्यकर्त्यांना भारताचे महत्त्व पटो आथवा न पटो पण भारताची महती त्यांच्या खेळाडूंनी मात्र ओखळली आहे. बॅडमिंटन खेळात प्रगती करायची असेल तर आम्हाला भारतात प्रशिक्षणासाठी आणि तेथील स्पर्धांमध्ये भाग घेण्यास पाठवा असे आर्जव पाकिस्तानची अव्वल बॅडमिंटनपटू माहूर शेहझादने त्यांच्या क्रीडा प्रशासनांना केले आहे. 

लाहोर : पाकिस्तानी राज्यकर्त्यांना भारताचे महत्त्व पटो आथवा न पटो पण भारताची महती त्यांच्या खेळाडूंनी मात्र ओखळली आहे. बॅडमिंटन खेळात प्रगती करायची असेल तर आम्हाला भारतात प्रशिक्षणासाठी आणि तेथील स्पर्धांमध्ये भाग घेण्यास पाठवा असे आर्जव पाकिस्तानची अव्वल बॅडमिंटनपटू माहूर शेहझादने त्यांच्या क्रीडा प्रशासनांना केले आहे. 
माहूरने लाहोरमध्ये नुकत्याच झालेल्या पाकिस्तानच्या राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत महिला एकेरीचे विजेतेपद मिळवले. भारत बॅडमिंटनमध्ये कमालीची प्रगती करत आहे म्हणून आपल्याला भारतात जायचे आहे असे ती म्हणते. भारत बॅडमिंटनमधील सुपरपॉवर आहे. त्यांचे प्रशिक्षकही उच्च श्रेणीचे आहे तेथे सातत्याने आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा होत असतात, असेही माहूरने सांगितले. 

इस्लामाबाद येथे 2017 मध्ये झालेल्या एका आंतरराष्ट्रीय स्पर्धेत माहूरने सुवर्णपदक मिळवले होते. आशियाई आणि राष्ट्रकुल स्पर्धेत तिने पाकिस्तानचे प्रतिनिधीत्व केलेले आहे. आता टोक्‍यो ऑलिंपिकमध्ये खेळण्याची तिची इच्छा आहे, परंतु त्यासाठी सराव आणि प्रगती करण्यासाठी भारतात जायचे आहे. 

क्रमवारीत पहिल्या 200 खेळाडूंत स्थान मिळवणारी मी पहिली पाकिस्तानी खेळाडू आहे, पहिल्या 70 खेळाडूंत स्थान मिळवण्याचे माझे पहिले उद्दिष्ठ आहे. त्यासाठी मला उच्च श्रेणीच्या प्रशिक्षकांकडून मार्गदर्शन मिळवण्याची गरज आहे. ऑलिंपिक प्रसाराच्या स्पर्धांतून आम्ही पाकिस्तानमध्ये खेळत आहोत तरिही आणखी प्रगती करण्यासाठी भारताच जाणे आवश्‍यक आहे, अते माहूर आवर्जून म्हणते. 

दहा वर्षांपासून भारत-पाक संबंध नाहीत 
माहूर शेहझाद हे एक उदाहरण आहे. पाकिस्तानी क्रिकेटपटूंना आयपीएलचे दरवाजे कधीच बंद झाले आहेत. 2008 मध्ये मुंबई हल्यानंतर भारताने पाकिस्तानबरोबरचे क्रीडा संबंधही तोडले आहेत. 
 

संबंधित बातम्या