पाकिस्तानी प्रेक्षकांनी तिकीटे विकली बांगलादेशच्या प्रेक्षकांना

सुनंदन लेले
Friday, 28 September 2018

दुबई : बांगलादेशने पाकिस्तानला पराभूत करून अंतिम फेरीत धडक मारल्याने पाकिस्तानी चाहत्यांना निराशेचा सामना करावा लागला. बर्‍याच लोकांनी आपली तिकिटे विकली जी बांगलादेशी प्रेक्षकांनी आनंदाने विकत घेतली. मैदानात भारतीय प्रेक्षकांच्या बरोबरीने बांगलादेशी चाहते हजर होते. खरं सांगायचे झाले तर भारतीय प्रेक्षकांपेक्षा बांगलादेशी प्रेक्षक जास्त आरडा ओरडा करत आपल्या संघाला प्रोत्साहन देताना बघायला मिळाले.

जोरदार पाठिंबा

एकाचे नुकसान म्हणजे दुसर्‍याचा लाभ हीच गोष्ट दुबई स्टेडियमला बघायला मिळाली. पाकिस्तानी प्रेक्षकांनी मोठ्या उत्साहाने अंतिम सामन्याची तिकिटे विकत घेऊन ठेवली होती. 

कवी एकच

आशिया कप अंतिम सामना चालू होण्याअगोदर परंपरेप्रमाणे भारत आणि बांगलादेश संघाची राष्ट्रगीते गायली गेली. पहिल्यांदा बांगलादेशचे राष्ट्रगीत आमार सोनार बांगला गायले गेले आणि नंतर भारतीय प्रेक्षकांनी तालासुरात जन गण मन गायले. लक्षणीय गोष्ट अशी की दोन्ही राष्ट्रगीताचे कवी एकच आहेत. होय रवींद्रनाथ टागोर यांनी भारताचे राष्ट्रगीत लिहिले तसेच बांगलादेशचे राष्ट्रगीत रवींद्रनाथ टागोर यांनीच लिहिले आहे.

फक्त निराशा

अंतिम सामन्याला सुरुवात होताना पत्रकार कक्षात शांतपणा, उत्साह आणि निराशा असे तिन्ही रंग बघायला मिळाले. भारतीय पत्रकार शांत होते कारण भारतीय संघाने अंतिम फेरी गाठणे यात त्यांना काही खास वाटत नव्हते.

बांगलादेशी पत्रकारांच्यात कमालीचा उत्साह जाणवत होता. पाकिस्तानला पराभूत करून अंतिम सामन्यात दाखल झाल्याचा सार्थ अभिमान बांगलादेशी पत्रकारांना आपल्या संघाचा वाटत होता. परंतु पाकिस्तानी पत्रकारांच्यात आणि टीव्ही कॉमेंटरी करत असलेल्या पाकिस्तानच्या माजी खेळाडूंमधे कमालीची निराशा स्पष्ट जाणवत होती. अपेक्षांना मातीत मिसळणारा खेळ पाकिस्तानी संघाने केला. केवळ अंतिम सामना असल्याने पत्रकारांना मायदेशी परत न जाता वार्तांकन करावे लागत होते. साहजिकच त्यांच्या हालचालीत बोलण्यात निराशा सतत डोकावत होती.

संबंधित बातम्या