पाकच्या यासीरने मोडला दुसऱ्या महायुद्धापूर्वीचा विक्रम

वृत्तसंस्था
Thursday, 6 December 2018

यासीरने न्यूझीलंडच्या विल्यम सोमरविले याला बाद करून 33व्या कसोटी सामन्यात ही कामगिरी केली. त्याने क्‍लेरी ग्रिमेट यांचा विक्रम मोडीत काढला. त्यांनी 36 कसोटींत अशी कामगिरी केली होती. 

अबुधाबी : पाकिस्तानचा फिरकी गोलंदाज यासीर शाह याने कसोटी क्रिकेटमध्ये झटपट दोनशे गडी बाद करण्याचा विक्रम केला. त्याने आपल्या कामगिरीने 82 वर्षे जुना विक्रम मोडीत काढला. 

यासीरने न्यूझीलंडच्या विल्यम सोमरविले याला बाद करून 33व्या कसोटी सामन्यात ही कामगिरी केली. त्याने क्‍लेरी ग्रिमेट यांचा विक्रम मोडीत काढला. त्यांनी 36 कसोटींत अशी कामगिरी केली होती. 

पहिला कसोटी सामना गमावल्यानंतर यासीरच्या सामन्यातील 14 गडी बाद करण्याच्या कामगिरीने पाकिस्तानला विजय मिळवून मालिकेत बरोबरी साधण्यात यश आले होते. यासीरने या कसोटी मालिकेत आताच 27 गडी बाद केले आहेत. पाकिस्तानसाठी ही आणखी एक विक्रमी कामगिरी आहे. यासीरने कारकिर्दीत 100 गडी बाद करण्याचाही विक्रम केला होता. त्याने 17 कसोटींतच ही कामगिरी केली होती. अवघ्या नऊ कसोटी 50 गडी बाद करण्याचा विक्रमही त्याने केला आहे. 

संबंधित बातम्या