साईनाच्या यशाकडेही लक्ष द्या : गोपीचंद 

वृत्तसंस्था
Monday, 29 October 2018

साईनाने तईविरुद्धच्या सलग बारा लढती गमावल्या आहेत. "प्रतिकूल परिस्थितीतही गुण जिंकण्याची तईची क्षमता आहे. त्यामुळेच तर ती सर्वोत्तम आहे. साईनाचा खेळही उंचावत आहे. मात्र ती आघाडी गमावत आहे.

हैदराबाद : साईना नेहवालच्या तई झू यिंगविरुद्धच्या पराभवाच्या मालिकेची चर्चा होते; पण आता साईना केवळ तिच्याच विरुद्ध पराजित होत आहे. जपानी वर्चस्व मोडून काढले आहे, हे लक्षात घ्यायला हवे, असे मत भारतीय बॅडमिंटन मार्गदर्शक पुल्लेला गोपीचंद यांनी व्यक्त केले.

साईनाने तईविरुद्धच्या सलग बारा लढती गमावल्या आहेत. "प्रतिकूल परिस्थितीतही गुण जिंकण्याची तईची क्षमता आहे. त्यामुळेच तर ती सर्वोत्तम आहे. साईनाचा खेळही उंचावत आहे. मात्र ती आघाडी गमावत आहे. तईला हरवणे अशक्‍य आहे हे मला मान्य नाही. आम्ही नक्कीच त्यादृष्टीने विचार करत आहोत. त्याची योजनाही तयार होत आहे, पण त्याबाबत चर्चा करणे अयोग्य होईल,' असे गोपीचंद यांनी सांगितले. 

साईना आता केवळ तईविरुद्धच पराजित होत आहे, पण आता ओकुहारा, यामागुची, तसेच चिनी मुलींना पराजित करीत आहे. ब्रेकनंतरही तिने हे साधले आहे. साईनाचे आव्हान केवळ तईच नाही, तर कॅरोलीन मरिनही आहे. सातत्याने सर्वोत्तम खेळ करणे सोपे नाही, त्यासाठीच्या पूर्वतयारीला फारसा वेळ नसतो. लागोपाठच्या स्पर्धांमुळे आव्हान अवघड होते, असेही गोपीचंद यांनी नमूद केले.

संबंधित बातम्या