जोकोविचचा पुन्हा धक्कादायक पराभव 

वृत्तसंस्था
Wednesday, 27 March 2019

जोकोविच कारकिर्दीतील 850वा विजय मिळविण्यासाठी प्रयत्नशील होता; पण आता त्याला आणखी प्रतीक्षा करावी लागेल. इंडियन वेल्समध्ये जोकोविचचा जर्मनीच्या फिलीप कोलश्‍क्रायबर याच्याकडून तिसऱ्याच फेरीत पराभव झाला होता. 

मायामी, फ्लोरिडा : अग्रमानांकित नोव्हाक जोकोविचला मायामी एटीपी मास्टर्स 1000 टेनिस स्पर्धेच्या चौथ्याच फेरीत पराभवाचा धक्का बसला. स्पेनच्या रॉबर्टो बॉटिस्टा आगुट याच्याकडून तो 1-6, 7-5, 6-3 असा हरला. याआधी इंडियन वेल्समधील स्पर्धेतही तो अपयशी ठरला होता. स्वतः जोकोविचने कोर्टबाहेरील कारणांमुळे लक्ष विचलित झाल्याचे सांगितले. 

जोकोविच कारकिर्दीतील 850वा विजय मिळविण्यासाठी प्रयत्नशील होता; पण आता त्याला आणखी प्रतीक्षा करावी लागेल. इंडियन वेल्समध्ये जोकोविचचा जर्मनीच्या फिलीप कोलश्‍क्रायबर याच्याकडून तिसऱ्याच फेरीत पराभव झाला होता. 

आगुटविरुद्ध जोकोविचने याआधी नऊपैकी सात सामने जिंकले होते. या वेळीही पहिला सेट 33 मिनिटांत जिंकून त्याने सुरवात चांगली केली; पण नंतर त्याने पकड गमावली. तो 13पैकी चारच ब्रेकपॉइंट जिंकू शकला. सातपैकी तीन ब्रेकपॉइंटला त्याने सर्व्हिस गमावली. 6-1, 4-5 अशा स्थितीस पावसामुळे व्यत्यय आला होता. निर्णायक सेटमध्ये आधी त्याने ब्रेकची परतफेड केली; पण पुन्हा सहाव्या गेममध्ये त्याच्या सर्व्हिसवर गंडांतर आले. जोकोविचला याआधी कतार ओपनच्या उपांत्य फेरीतही रॉबर्टोकडून पराभूत व्हावे लागले होते. 

अशा प्रकारचा सामना मी हरायला नको होते. मी दुसऱ्या सेटमध्ये लय गमावली. मी रॉबर्टोला मोकळीक दिली आणि त्याने फायदा उठविला, पण दोष नक्कीच माझा आहे. मला असंख्य संधी मिळाल्या, ज्या मी दवडल्या. 

संबंधित बातम्या