World Cup 2019 : निवड तर झाली पण खेळता येणार का?; लोकपालांच्या अहवालावर सारे अवलंबून

संजय घारपुरे
Monday, 15 April 2019

मात्र भारतीय मंडळाने त्यांना पाठीशी घालत आयपीएल कार्यक्रमानुसार त्यांच्या चौकशीची वेळ दिली. त्याचवेळी संघनिवडीपूर्वी दोघांबाबत अहवाल देण्याबाबत दडपण आणण्याचा प्रयत्नही केल्याची चर्चा होती. मात्र न्यायाधीशांनी पूर्ण चौकशीनंतरच अहवाल देणार असल्याचे सांगितले होते. 

वर्ल्ड कप 2019 : मुंबई : खाजगी दूरचित्रवाणी कार्यक्रमात महिलांबाबत आक्षेपार्ह टिपण्णी केल्यामुळे हार्दिक पंड्या, तसेच केएल राहुल यांची भारतीय क्रिकेट मंडळाचे लोकपाल चौकशी करीत आहेत. त्यांचा अहवाल येण्यापूर्वीच या दोघांची विश्‍वकरंडक स्पर्धेसाठी संघात निवड करण्यात आली आहे. 

सर्वोच्च न्यायालयाने निवृत्त न्यायाधीश डी. के. जैन यांची भारतीय मंडळावर लोकपाल म्हणून नियुक्ती केली आहे. जैन यांनी महिलांवरील आक्षेपार्ह टिपण्णीबद्दल दोघांना गेल्याच महिन्यात नोटीस बजावली होती. मात्र भारतीय मंडळाने त्यांना पाठीशी घालत आयपीएल कार्यक्रमानुसार त्यांच्या चौकशीची वेळ दिली. त्याचवेळी संघनिवडीपूर्वी दोघांबाबत अहवाल देण्याबाबत दडपण आणण्याचा प्रयत्नही केल्याची चर्चा होती. मात्र न्यायाधीशांनी पूर्ण चौकशीनंतरच अहवाल देणार असल्याचे सांगितले होते. 

पंड्या तसेच राहुल यांची आठ दिवसांपूर्वी चौकशी झाली, पण त्याचा अहवाल आलेला नाही. या दोघांवर लोकपालांनी कारवाई केल्यास पर्यायी खेळाडू कोण, याबाबत निवड समिती अध्यक्ष प्रसाद यांनी काहीच सांगितले नाही. या प्रकरणात केवळ पंड्या आणि राहुल यांची टिपण्णीच नव्हे तर ते खाजगी वाहिनीवरील कार्यक्रमात कोणाची परवानगी घेऊन सहभागी झाल,ह्हिाही मुद्दा महत्त्वाचा होता. 

पंड्या तसेच राहुल हे भारतीय मंडळाबरोबर करारबद्ध खेळाडू आहेत. त्यांनी कोणत्याही मुलाखतीपूर्वी, तसेच कार्यक्रमातील सहभागापूर्वी भारतीय मंडळाची परवानगी घेणे बंधनकारक असते. त्या टिपण्णीचे वादळ जास्त घोंघावत असताना दोघांना तात्पुरते

संबंधित बातम्या