Asia Cup 2018 : बांगलादेशला कमी लेखून चालणार नाही : शिखर धवन 

वृत्तसंस्था
Friday, 28 September 2018

दुबई : आशिया करंडक स्पर्धेच्या अंतिम फेरीच्या पूर्वसंध्येला भारताचा सलामीवीर शिखर धवनने संघातील इतर सहकाऱ्यांना बांगलादेशच्या संघाला कमी न लेखण्याचा इशारा दिला आहे. 

पाकिस्तान संघाला 37 धावांनी पराभूत करत बांगलादेशने ऐटित अंतिम फेरीत गाठली. गेल्या दोन आठवड्यात सर्व संघांनी उत्तम कामगिरी केली आहे. भारतीय संघाला अंतिम फेरीत जिंकण्यासाठी सर्वोत्तम खेळ करण्याची गरज आहे, असे मत शिखर धवन व्यक्त केले. 

तो म्हणाला, ''सगळ्यांच संघानी स्पर्धेत चांगली कामगिरी केली आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यात अंतिम सामना होणार अशी सर्व चाहत्यांची अपेक्षा होती. मात्र, बांगलादेशने उत्तम क्रिकेट खेळत अंतिम फेरीत स्थान मिळविले. पाकिस्तानच्या संघाचे नाव मोठे असले तरीही बांगलादेशने त्यांच्यापेक्षा वरचढ खेळ करत अंतिम फेरी गाठली आहे. त्यामुळे आम्ही त्यांना कमी लेखण्याची चूक करणार नाही. कागदावर संघ मजबूत असणे आणि मैदानावर चांगली कामगिरी करणे यात फार फरक असतो. जो संघ मैदानावर चांगली कामगिरी करतो तोच संघ वरचढ ठरतो. 

विराट कोहलीच्या अनुपस्थितीत सलामीवीर रोहित शर्माकडे संघाच्या नेतृत्वाची धूरा सोपविण्यात आली आहे. तर शिखर धवनकडे  भारतीय संघाचे उपकर्णधारपद सोपविण्यात आले आहे. उपकर्णधारपदाचे दडपण नसल्याचेही त्याने सांगितले. तो म्हणाला, ''माझ्यावर उपकर्णधारपदाचे कोणतेही दडपण नाही. सर्व दडपण कर्णधारवर आहे. मी फक्त संघाचा उपकर्णधार असल्याची मजा घेत आहे. माझ्या फलंदाजीवर या काहीही परिणाम होणार नाही. माझ्यावर उपकर्णधारपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे म्हणून मी माझ्या खेळात बदल करणार नाही.'' 

संबंधित बातम्या