'नाडा'कडून पुढील सहा महिन्यात क्रिकेटपटूंच्या उत्तेजक चाचण्या 

वृत्तसंस्था
Monday, 18 March 2019

सर्वोच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या बीसीसीआयच्या प्रशासकीय समितीने आज मुंबईत आयसीसीचे कार्याध्यक्ष शशांक मनोहर यांची भेट घेतली आणि पुढील सहा महिने प्रायोगिकतत्वावर "नाडा' राष्ट्रीय उत्तेजक प्रतिबंधक समितीबरोबर कार्य करणार असल्याची ग्वाही दिली. 

मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या बीसीसीआयच्या प्रशासकीय समितीने आज मुंबईत आयसीसीचे कार्याध्यक्ष शशांक मनोहर यांची भेट घेतली आणि पुढील सहा महिने प्रायोगिकतत्वावर "नाडा' राष्ट्रीय उत्तेजक प्रतिबंधक समितीबरोबर कार्य करणार असल्याची ग्वाही दिली. 

आंतरराष्ट्रीय क्रिकेटला 'नाडा' असो वा 'वाडा' (जागतिक उत्तेजक प्रतिबंधक एजन्सी) यांच्याशी जोडण्याचा प्रयत्न कित्येक वर्षांपासून होत आहे. पण बीसीसीआयच्या विरोधामुळे या प्रयत्नांना यश येत नव्हते. राष्ट्रकुल, आशियाई किंवा पुढे जाऊन ऑलिंपिकमध्ये क्रिकेटचा समावेश करायचा असेल तर 'वाडा' आणि 'नाडा' यांची उत्तेजक प्रतिबंधक नियमावली मान्य करणे आवश्‍यक आहे. पुढील सहा महिने आम्ही नाडाबरोबर कार्य करू पण त्यांना केवळ दहा टक्के नमुनेच चाचणीला घेता येईल, असे सांगण्यात आल्याचे समजते. 

2022 मधील राष्ट्रकुल स्पर्धेत क्रिकेटचा समावेश होण्याची शक्‍यता आहे. बर्मिंगहॅम येथे होणाऱ्या या स्पर्धेसाठी भारत महिलांचा संघ पाठवण्याची शक्‍यता आहे. त्यासाठी वाडाच्या नियमावलीशी आयसीसी आग्रही आहे त्यासाठी बीसीसीआयने प्रथम त्यांच्या राष्ट्रीय उत्तेजक प्रतिबंध एजन्सीबरोबर जोडणे आवश्‍यक आहे. 

बीसीसीआय आणि नाडा यांना मतभेद मिटवून एकत्र काम करण्याची गरज असल्याचे मत आयसीसीची मुख्य कार्यकारी डेव्ह रिचर्डस्‌न यांनी गेल्याच महिन्यात म्हटले होते. 2028 च्या ऑलिंपिकमध्ये क्रिकेटचा समावेश होऊ शकतो त्यासाठी बासीसीआयने अगोदर नाडा आणि त्यानंतर वाडाशी मिळते जुळते घेऊन पुढे जायला हवे त्यासाठी आम्ही सहकार्य करत आहोत, असेही रिचर्डस्‌न म्हणाले होते. 

चाचणीसाठी दुसऱ्या एजन्सी ठरवा 
दरम्यान बीसीसीआयचा नाडावर पूर्ण विश्‍वास नाही. वाडाने चाचणीसाठी दुसऱ्या एजन्सी नेमाव्या अशे या बैठकीसाठी उपस्थित असलेल्या बीसीसाआयच्या एका पदाधिकाऱ्याने सांगितल्याचे समजते.

संबंधित बातम्या