Asia Cup 2018 : धोनी जैसा कोई नही.. अजूनही..!

वृत्तसंस्था
Saturday, 29 September 2018

या सामन्यात त्याने बांगलादेशचा यष्टीरक्षक मुशफिकूर रहिमला धावबाद करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांनी सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. रहिमला धावबाद करताना त्याने दाखवलेल्या चपळाईने यष्टीरक्षणात त्याला कोणाचीही तोड नसल्याचे पुन्हा सिद्ध झाले.

दुबई : भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीने 2004मध्ये भारतीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले आणि त्याच्यारुपाने भारताला एक उत्कृष्ट यष्टीरक्षक मिळाला. धोनीच्या वाढत्या वयानुसार त्याच्या फलंदाजीतील स्फोटकपणा कमी झाला असला तरी आजही यष्टीरक्षणात कोणीही त्याची बरोबरी करु शकत नाही. याचाच प्रत्यय आशिया करंडक स्पर्धेच्या अंतिम सामन्यातही आला. 

बांगलादेशविरुद्धच्या अंतिम सामन्यात धोनीने दोन फलंदाजांना यष्टीचित करत यष्टींमागे 800 बळी मिळविण्याचा विक्रम केला. आशिया खंडात अशी कामगिरी करणारा तो पहिला यष्टीरक्षक ठरला आहे. त्याने सलामीवीर लिटॉन दास आणि बांगलादेशचा कर्णधार मश्रफी मुर्तझा यांना यष्टीचित केले. मात्र या सामन्यात त्याने बांगलादेशचा यष्टीरक्षक मुशफिकूर रहिमला धावबाद करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांनी सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. रहिमला धावबाद करताना त्याने दाखवलेल्या चपळाईने यष्टीरक्षणात त्याला कोणाचीही तोड नसल्याचे पुन्हा सिद्ध झाले.

रहिम सुदैवाने धावबाद झाला नसला तरीही धोनीच्या चपळाईचे सोशल मीडियावर फार कौतुक केले जात असून त्याचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे.      

संबंधित बातम्या