धोनीने स्थानिक क्रिकेट खेळण्यावर जास्त भर द्यावा : गावसकर

वृत्तसंस्था
Friday, 28 September 2018

धोनीने नक्कीच स्थानिक क्रिकेट खेळावे आणि त्याने सर्व नवोदित खेळाडूंसह चार दिवसांचे सामने खेळावेत. त्याच्या अनुभवाचा सर्व तरुण खेळाडूंना प्रचंड फायदा होईल,

दुबई : भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीने स्थानिक क्रिकेट खेळण्यावर जास्त भर द्यावा असे मत भारताचे माजी कर्णधार सुनील गावसकर यांनी व्यक्त केले आहे. 

धोनी झारखंडचा असून त्याच्या आधी या राज्यातून भारतीय क्रिकेटमध्ये कोणताच बडा खेळाडू झाला नव्हता. आता मात्र ही परिस्थिती बदलली आहे. झारखंडमधून सौरभ तिवारी, शाबाज नदीम आणि ईशान किशन असे गुणवान खेळाडू भारतीय क्रिकेटला लाभले आहेत. धोनीने झारखंडमधील खेळाडूंसह स्थानिक क्रिकेट खेळण्यावर भर दिला तर याचा सर्व युवा खेळाडूंना प्रोत्साहन मिळण्यासाठी फायदा होईल असे गावसकरांना वाटते. 

''धोनीने नक्कीच स्थानिक क्रिकेट खेळावे आणि त्याने सर्व नवोदित खेळाडूंसह चार दिवसांचे सामने खेळावेत. त्याच्या अनुभवाचा सर्व तरुण खेळाडूंना प्रचंड फायदा होईल,'' असे मत गावसकरांनी व्यक्त केले. 

ते म्हणाले, ''तो बऱ्याचवेळा संघासोबत प्रवास करतो. तसेच तो झारखंडच्या संघातील सर्व खेळाडूंसाठी मार्गदर्शकाची भूमिका बजावतो मात्र, तो या सर्व खेळाडूंसह स्थानिक क्रिकेटमध्ये खेळला तर त्यांचे मनोबल वाढण्यास मदत होईल." 

संबंधित बातम्या