शमीला पत्नीकडून जीवे मारण्याची धमकी; सुरक्षेची मागणी

वृत्तसंस्था
Monday, 1 October 2018

भारताचा वेगवान गोलंदाज मोहंमद शमीच्या वैयक्तिक जीवनातील शुक्लकाष्ट काही संपता संपेना, कारणकी पत्नीच्या आरोपानंतर आता त्याला पत्नीनेच जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. त्यामुळे त्याने सुरक्षेची मागणी केली आहे.

नवी दिल्ली : भारताचा वेगवान गोलंदाज मोहंमद शमीच्या वैयक्तिक जीवनातील शुक्लकाष्ट काही संपता संपेना, कारणकी पत्नीच्या आरोपानंतर आता त्याला पत्नीनेच जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. त्यामुळे त्याने सुरक्षेची मागणी केली आहे.

गेले वर्ष शमीसाठी कठीण परिस्थितीचे गेले आहे. त्याची पत्नी हसीन जहाँ हिने त्याच्यावर अत्याचाराचे आरोप केले होते. त्यातून काही दिलासा मिळतोय तोपर्यंत त्याने पत्नीकडून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. त्यामुळे त्याने सरकारकडे सुरक्षेची मागणी केली आहे. शमीने त्याच्या पत्नीविरोधातील खटला जिंकला होता. त्याच्या पत्नीची दरमहा दहा लाख रुपये देण्याची मागणी फेटाळून लावली होती. पण, शमीने आपल्या मुलांसाठी 80 हजार रुपये देण्याचे मान्य केले होते.

एका वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार, शमीकडे आपल्या पत्नीकडून जीवे मारण्याची धमकी आल्याचे पुरावे आहेत. पुरावे त्याने सरकारकडे जमा केले असून, बंदुकधारी सुरक्षा रक्षक सुरक्षेसाठी देण्याची मागणी केली आहे. शमीच्या पत्नीने त्याच्याविरोधात अनेक गुन्हे दाखल केलेले आहेत. त्यामुळे त्याला या खटल्यांना सामोरे जावे लागणार आहे.

संबंधित बातम्या