World Cup 2019 : त्या दोन वर्षांत खूप शिकलो अन्... : शमी

वृत्तसंस्था
Wednesday, 17 April 2019

विश्‍वकरंडकाच्या गेल्या म्हणजे 2105 मधील स्पर्धेत महंमद शमी हा गुणी गोलंदाज भारताला गवसला होता; पण त्यानंतर तंदुरुस्ती अभावी तो तब्बल दोन वर्षे संघाबाहेर राहिला. या दोन वर्षांच्या कालावधीने आपल्याला खूप काही शिकविले असे शमीने पुन्हा एकदा विश्‍वकरंडक खेळण्याची संधी मिळाल्यावर सांगितले. 

वर्ल्ड कप 2019 : नवी दिल्ली : विश्‍वकरंडकाच्या गेल्या म्हणजे 2105 मधील स्पर्धेत महंमद शमी हा गुणी गोलंदाज भारताला गवसला होता; पण त्यानंतर तंदुरुस्ती अभावी तो तब्बल दोन वर्षे संघाबाहेर राहिला. या दोन वर्षांच्या कालावधीने आपल्याला खूप काही शिकविले असे शमीने पुन्हा एकदा विश्‍वकरंडक खेळण्याची संधी मिळाल्यावर सांगितले. 

माझ्यासाठी तीन दोन वर्षे खूप मेहनतीची आणि महत्त्वाची होती, असे सांगून शमी म्हणाला,"या दोन वर्षांत राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमधील प्रशिक्षक, फिजिओ यांनी माझ्यावर खूप मेहनत घेतली. मीदेखील त्यांच्या सांगण्यानुसार स्वतःला बदलत गेलो. याचा फार मोठा फायदा आपल्याला कारकिर्दीत पुन्हा उभे राहताना झाला.'' 

तंदुरुस्ती म्हणजे काय, तिचे महत्त्व आणि कशी राखायची हे मला या कालावधीत समजले. तेव्हापासून मी तंदुरुस्तीकडे दुर्लक्ष केले नसल्याचे सांगून शमी म्हणाला, "गेले 18 महिने जेवढा सातत्याने खेळलो आहे, तेवढीच मेहनत तंदुरुस्ती राखण्यावर केली आहे. त्याचबरोबर खेळात सातत्याने बदल करत गेलो. परिस्थितीनुसार कामगिरी करण्याचे उद्दिष्ट ठेवले आणि त्यानुसारच सुधारणा केली.'' 

आजारपणाच्या विश्रांतीच्या काळात सराव आणि मेहनत सुरू असली तरी, माझे वजन वाढले होते. गेल्या सहा महिन्यांत मात्र यात आमूलाग्र बदल झाला आहे. एक तर माझे वजनही कमी झाले आणि माझ्या हालचाली अधिक सहज झाल्या. आता तंदुरुस्ती आणि कामगिरीमधील सातत्य विश्‍वकरंडक स्पर्धेत राखण्यासाठी मी नक्कीच प्रयत्न करेन, असेही त्याने सांगितले. 

विश्‍वकरंडकापूर्वी "आयपीएल' खेळण्याचा नक्कीच फायदा होईल. विश्‍वकरंडकापूर्वी खेळायला मिळालेली ही कठीण स्पर्धा होती. त्यामुळे विश्‍वकरंडकासाठी शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या तयार होण्यास या स्पर्धेत खेळल्याचा फायदाच मिळेल. 
महंमद शमी, भारताचा वेगवान गोलंदाज

संबंधित बातम्या