सानिया, शोएबच्या घरी नव्या पाहुण्याचे आगमन

टीम ई सकाळ
Tuesday, 30 October 2018

भारताची आघाडीची टेनिसपटू सानिया मिर्झा आणि तिचा पती पाकीस्तानी क्रिकेटर शोएब मलिक यांच्या घरी ज्युनिअर शोएबचे आगमन झाले आहे. सानियाने आज (ता.30) मंगळवारी पहाटे गोंडस मुलाला जन्म दिला आहे. शोएब मिलकने ही आनंदाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली आहे. शोएब मलिकने आज सकाळी साडेसात वाजता ट्विटरवर सानिया आई बनल्याचे जाहीर केले.

हैद्राबाद- भारताची आघाडीची टेनिसपटू सानिया मिर्झा आणि तिचा पती पाकीस्तानी क्रिकेटर शोएब मलिक यांच्या घरी ज्युनिअर शोएबचे आगमन झाले आहे. सानियाने आज (ता.30) मंगळवारी पहाटे गोंडस मुलाला जन्म दिला आहे. शोएब मिलकने ही आनंदाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली आहे. शोएब मलिकने आज सकाळी साडेसात वाजता ट्विटरवर सानिया आई बनल्याचे जाहीर केले.

शोएबने ट्विटरवर म्हटले आहे की, कळवताना अतिशय आनंद होतोय की, आम्हाला मुलगा झाला आणि सानियाची प्रकृती उत्तम असून ती नेहमीप्रमाणे खंबीर आहे, तुमच्या प्रार्थना आणि शुभेच्छांसाठी सर्वांचे आभार, असे शोएबने म्हटले आहे.
 

दरम्यान काही दिवसांपूर्वी सानिया मिर्झाने आपल्या मुलाचं नाव मिर्झा मलिक असं ठेवणार असल्याचे सांगितले होते. माझ्या आणि शोएबच्या नावाने माझं मुल भविष्यात ओळखले जावे अशी तिची इच्छा असल्याचे तिने सांगितले होते. 31 वर्षीय सानिया मिर्झाने 2010 साली पाकिस्तानी क्रिकेटपटू शोएब मलिकशी विवाह केला होता. हैदराबादमध्ये पारंपरिक पाकिस्तानी पद्धतीनुसार हा विवाहसोहळा पार पडला होता.

संबंधित बातम्या