Asia Cup 2018 : 'भारताला फायनलमध्ये बघून घेऊ'

वृत्तसंस्था
Wednesday, 26 September 2018

अबुधाबी : आशिया करंडकात भारताकडून दोनवेळा झालेल्या पराभवाचा बदला अंतिम सामन्यात घेऊ, असे पाकिस्तानचे प्रशिक्षक मिकी आर्थर यांनी म्हटले आहे.

अबुधाबी : आशिया करंडकात भारताकडून दोनवेळा झालेल्या पराभवाचा बदला अंतिम सामन्यात घेऊ, असे पाकिस्तानचे प्रशिक्षक मिकी आर्थर यांनी म्हटले आहे.

आशिया करंडकात आतापर्यंत पाकिस्तानला भारताकडून दोनवेळा सहज पराभव स्वीकारावा लागलेला आहे. पहिल्या आणि दुसऱ्या सामन्यात पाकिस्तानच्या फलंदाजांनी भारताच्या गोलंदाजांपुढे लोटांगण घेतल्याचे पाहायला मिळाले. आज (बुधवार) पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यात सुपर फोरमधील लढत होत आहे, यातील विजेता संघ भारताशी अंतिम फेरीत झुंजणार आहे. पाकिस्तानचे अंतिम फेरीत स्थान निश्चित होण्यापूर्वीच आर्थर यांनी भारताला इशारा दिला आहे.

आर्थर म्हणाले, की पाकिस्तानचा संघ बांगलादेशविरुद्ध होणाऱा सुपर फोरमधील सामना सहज जिंकेल. त्यानंतर अंतिम सामन्यात पाकिस्तानला भारताकडून स्वीकारावा लागलेल्या दोन पराभवांचा बदला घ्यायचा आहे. भारताविरूद्ध सुपर फोर सामन्यात काही बळी आधी मिळाले असते तर परिस्थिती वेगळी असती. भारताने पाकिस्तानचा लाजिरवाणा पराभव केला, हे आम्हाला मान्य आहे. त्यामुळे आता पुढील सामन्यात पाकिस्तान चांगले प्रदर्शन करेल.

संबंधित बातम्या