भारताची सुपरमॉम ठरली जगात अव्वल

वृत्तसंस्था
Friday, 11 January 2019

संपूर्ण क्रीडाक्षेत्रात सुपरमॉम अशी ओळख असलेल्या बॉक्सर मेरी कोमने आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग क्रमवारीत (एआयबीए) पहिले स्थान पटकाविले आहे. सातत्यपूर्ण कामगिरीच्या जोरावर तिने पहिल्या क्रमांकावर झेप घेतली आहे. 

नवी दिल्ली : संपूर्ण क्रीडाक्षेत्रात सुपरमॉम अशी ओळख असलेल्या बॉक्सर मेरी कोमने आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग क्रमवारीत (एआयबीए) पहिले स्थान पटकाविले आहे. सातत्यपूर्ण कामगिरीच्या जोरावर तिने पहिल्या क्रमांकावर झेप घेतली आहे. 

गेल्यावर्षी मेरीने राष्ट्रकुल स्पर्धा आणि पोलंडमधील आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धा या दोन्ही स्पर्धांमध्ये सुवर्णपदक पटकविले होते. नुकतेच तिने जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत ४८ किलो वजनी गटात विश्वविक्रमी सहावे विजेतेपद मिळवले होते. या कामगिरीच्या जोरावरच तिने आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग क्रमवारीत ७०० गुणांसह ४८ किलो वजन गटात अव्वल स्थान मिळविले. 

संबंधित बातम्या