मेरी कोम आणि क्रीडामत्र्यांचा बॉक्सिंगचा एकत्र सराव

वृत्तसंस्था
Friday, 2 November 2018

दीरा गांधी स्टेडियममध्ये झालेल्या प्रेक्षणीय सराव सत्रात मेरी कोम आणि राठोड यांनी एकत्र सराव केला. त्या दोघांमध्ये झालेली बॉक्सिंगची लढत चांगलीच रंगली.​

नवी दिल्ली : भारताची पाच वेळा जागतिक चॅम्पियन आणि भारताचे क्रीडा मंत्री राज्यवर्धनसिंह राठोड यांना गुरुवारी एकत्र बॉक्सिंगचा सराव करताना पाहण्याचा योग प्रेक्षकांना मिळाला. मेरी कोम क्रीडामंत्र्याना ठोसे लगावतानाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. 

इंदीरा गांधी स्टेडियममध्ये झालेल्या प्रेक्षणीय सराव सत्रात मेरी कोम आणि राठोड यांनी एकत्र सराव केला. त्या दोघांमध्ये झालेली बॉक्सिंगची लढत चांगलीच रंगली. यात मेरीने अनुभवाच्या जोरावर आपली करामत दाखवली तर माजी ऑलिम्पिक पदक विजेते राठोड यांनाही तिला एक दोन पंच मारले. 

मेरीने गुरुवारी तिच्या ट्विटर अकांउटवरुन हा व्हिडीओ शेअर करत राठोड यांचे त्यांनी दिलेल्या पाठिंब्यासाठी आभार मानले. राठोड हे स्वत: ऑलिम्पिक ब्रॉंझ पदक विजेते असून ते नेहमीच प्रत्येक खेळाडूला प्रोत्साहित करण्यात पुढाकार घेतात. 
 

संबंधित बातम्या