शहीद मॅरेथॉनमध्ये धावले 6 हजारहून अधिक स्पर्धक

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 24 February 2019

शहीद मॅरेथॉन ही 21 किलोमीटरची मुख्य स्पर्धा होती. या स्पर्धेसाठी सर्वाधिक स्पर्धक सहभागी होते. त्याचबरोबर पोलिस अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी "पोलिस अधीक्षक कप' या 10 किलोमीटर स्पर्धेत अनेक पोलिस धावले. शालेय विद्यार्थ्यासाठीच्या दोन किलोमीटरच्या किडस्‌ ड्रिम रन, चार किलोमीटरची चॅम्पीयन रन, 10 किलोमीटरची ग्रीन रन तसेच 18 ते 40, 40 ते 55, 55 ते 65 आणि 65 वर्षावरील गटातही उत्साह दिसला. अंधासाठी एक किलोमीटरची स्पर्धाही घेतली गेली.

सांगली : शहीद अशोक कामटे स्मृती फाऊंडेशन आणि जिल्हा पोलिस दलाच्यावतीने आयोजित "शहीद मॅरेथॉन' स्पर्धेत देशभरातून आलेले सहा हजारहून अधिक स्पर्धक धावले. स्पर्धक आणि प्रेक्षक यांच्या गर्दीमुळे सांगली-मिरज रस्ता गजबजून गेला होता. स्पर्धेच्या माध्यमातून शहीदांना अभिवादन करण्यात आले.

विश्रामबाग येथील पोलिस मुख्यालयासमोरील चौकात सकाळी सहाच्या सुमारास हजारो स्पर्धक धावण्यासाठी सज्ज होते. लहानापासून ते वृद्ध खेळाडू उत्साहात सहभागी झाले होते. कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे-पाटील यांच्याहस्ते झेंडा दाखवून स्पर्धेला सुरवात झाली. पोलिस अधीक्षक सुहैल शर्मा, सांगलीचे माजी जिल्हाधिकारी विजयकुमार काळम, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजीत राऊत, अप्पर पोलिस अधीक्षक शशिकांत बोराटे, उपाधीक्षक संदीप गिल, अशोक वीरकर, गिरीष चितळे, प्रमोद चौगुले, समीत कदम आदींसह फाऊंडेशनचे पदाधिकारी, पोलिस अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

शहीद मॅरेथॉन ही 21 किलोमीटरची मुख्य स्पर्धा होती. या स्पर्धेसाठी सर्वाधिक स्पर्धक सहभागी होते. त्याचबरोबर पोलिस अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी "पोलिस अधीक्षक कप' या 10 किलोमीटर स्पर्धेत अनेक पोलिस धावले. शालेय विद्यार्थ्यासाठीच्या दोन किलोमीटरच्या किडस्‌ ड्रिम रन, चार किलोमीटरची चॅम्पीयन रन, 10 किलोमीटरची ग्रीन रन तसेच 18 ते 40, 40 ते 55, 55 ते 65 आणि 65 वर्षावरील गटातही उत्साह दिसला. अंधासाठी एक किलोमीटरची स्पर्धाही घेतली गेली.

स्पर्धेसाठी सांगली-मिरज मार्गावर पोलिसांचे विशेष पायलटिंग ठेवण्यात आले होते. स्पर्धा पाहण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा नागरिकांनी गर्दी केली होती. मार्गावर ठिकठिकाणी पाण्याची सोय केली होती. वैद्यकीय पथकही तत्पर होते. मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्तही तैनात होता.

संबंधित बातम्या